दरवर्षी हिवाळ्याची सुरुवात होत असताना वाढणारे प्रदूषण ही एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. या प्रदूषणाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच होतो असे नाही, तर त्याचा धोका हृदय आणि मेंदूवरही सतत वाढत चालला आहे.
हवेमध्ये उपस्थित असलेले अतिसूक्ष्म कण श्वासावाटे फुफ्फुसांच्या खोलापर्यंत पोहोचतात. हे अतिसूक्ष्म कण रक्तप्रवाहात प्रवेश करून शरीरात जळजळ आणि ऑक्सिडेशनचा ताण वाढवू शकतात. यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो आणि हृदयविकार, हार्ट अटॅक तसेच स्ट्रोकचा धोका वाढतो.
डॉक्टरांच्या मते, हृदय, मेंदू आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचतेय प्रदूषणमधील अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांमध्ये पोहोचल्यानंतर रक्तप्रवाहाच्या माध्यमातून शरीराच्या इतर अवयवांपर्यंतही पोहोचत आहेत. याचा थेट प्रभाव हृदय, रक्तवाहिन्या, किडनी आणि पचनसंस्थेवर पडत आहे. यामुळेच दमा, सीओपीडी आणि हार्ट अटॅकच्या समस्या होण्याची शक्यता असते.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार प्रदूषणामुळे हृदय, मेंदू यांसह शरीराच्या इतर यंत्रणांवरही विपरीत परिणाम होत आहेत. गेल्या वर्षी दिवाळीनंतर श्वास घेण्याच्या त्रासामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत सुमारे १५ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीतील एम्स, सफदरजंग, डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय क्षयरोग व श्वसन रोग संस्था आणि वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूटमध्ये २०२२ ते २०२४ या कालावधीत श्वासोच्छवासाच्या गंभीर आजारांनी ग्रस्त २,०४,७५८ हून अधिक रुग्ण आपत्कालीन विभागात पोहोचले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.