ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात मुंबईच्या जवानाला वीरमरण आलं आहे. एम. मुरली नाईक असं शहीद जवानाचं नाव आहे. मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी असलेले नाईक हे मुंबईतील घाटकोपर येथील कामराज नगरात राहत होते. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ते शहीद झाले.
भारत-पाकिस्तान या दोन देशांत तणाव वाढला आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्ताननं भारतात हल्ले करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानकडून गुरुवारी जम्मू-काश्मीरमध्ये भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेले जवान एम. मुरली नाईक हे शहीद झाले. देशासाठी बलिदान देणाऱ्या एम. मुरली नाईक यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
नाईक यांचं कुटुंब हे मूळचं आंध्र प्रदेशातील असून, काही वर्षांपूर्वी ते मुंबईत आलं होतं. घाटकोपरच्या कामराज नगरमध्ये चाळीत ते वास्तव्यास होते. या ठिकाणी पुनर्विकास होणार असल्यानं ही चाळ पाडण्यात आली. त्यानंतर ते कुटुंब पुन्हा आंध्र प्रदेशमध्ये परतलं होतं.
शहीद एम मुरली नाईक यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी श्रद्धांजली वाहिली. राजभवनाच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्टद्वारे त्यांनी शोक व्यक्त केला आहे. तर वाएसआर काँग्रेसचे नेते वाय एस जगनमोहन रेड्डी यांनीही शहीद जवान एम मुरली नाईक यांच्याप्रति शोक व्यक्त केला आहे. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान आम्हाला कायम प्रेरणा देत राहील. आम्ही कायम त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत, असंही रेड्डी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.