generic medicines truck sent from thane to ayodhya ram mandir
generic medicines truck sent from thane to ayodhya ram mandir saam tv
मुंबई/पुणे

Thane News: लाखो भाविकांसाठी जेनेरिक औषधांचा ट्रक ठाण्यातून अयोध्येला रवाना

विकास काटे

Thane :

अयोध्या नगरीमध्ये २२ जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्या हस्ते प्रभू श्री रामचंद्र (ram) यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या अभूतपूर्व सोहळ्यास देशभरातून लाखो रामभक्त तसेच भाविक उपस्थित राहणार आहेत. लाखोंच्या संख्येने या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या या भाविकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे (arjun deshpande) यांच्या नेतृत्वखाली जेनेरिक आधारची ट्रक भरून औषधे (generic medicines) आज (बुधवार) अयोध्या नगरीकडे रवाना झाली. (Maharashtra News)

सुमारे ५०० वर्षानंतर अयोध्येमध्ये उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यातून तसेच परदेशातून रामभक्त तसेच भाविक मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये उपस्थित राहणार आहेत.

लाखोंच्या संख्येत आलेल्या भाविकांना वैद्यकीय औषधांची गरज लागू शकते. भाविकांना योग्य वेळी औषधे मिळावीत, त्याची उणीवा भासू नये यासाठी "श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र" ट्रस्ट तर्फे भारतातील सर्वात वेगाने वाढणारी फार्मा कंपनी "जेनेरिक आधार" ला औषधे पुरवठा करण्यास निवेदन आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याचा स्वीकार करीत २१ वर्षीय युवा उद्योजक, जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्यात आज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथे विनामूल्य औषधे रवाना करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024 MI vs KKR : अखेरच्या सामन्यातही मुंबईचा पराभव; केकेआर संघाचं प्लेऑफचं तिकीट कन्फर्म

Asaduddin Owaisi: एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल: असदुद्दीन ओवेसी

KKR vs MI : मुंबईसमोर कोलकाताचं १६ षटकात १५८ धावांचं लक्ष्य; सामन्यात पावसाचा व्यत्यय

Jalna lok sabha: कोण होणार जालन्याच्या खासदार? भाजपाचा विजयी रथ काँग्रेस रोखणार?

Maharashtra Politics 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणात फतवा'राज'; महायुतीसाठी राज ठाकरेंचा हिंदूंना फतवा

SCROLL FOR NEXT