Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

GB Syndrome: पुण्यात जीबी सिंड्रोमचं थैमान, रुग्णांची संख्या 59 तर 22 व्हेंटिलेटरवर

GB Syndrome Outbreak: पुण्यात जीबी सिंड्रोमने थैमान घातलंय. 2 दिवसात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत अडीच पट वाढ झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

पुण्यात जीबी सिंड्रोमने थैमान घातलंय..तर 2 दिवसात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांच्या संख्येत अडीच पट वाढ झालीय. या आजाराचे कोणत्या वयोगटात किती रुग्ण आढळून आले आहेत आणि या आजारापासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यावी? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

अवघ्या 2 दिवसात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये तब्बल अडीच पट वाढ झालीय...यात 38 पुरुष आणि 21 महिलांना या सिन्डोमची लागण झालीय...एवढंच नाही तर 59 रुग्णांपैकी २२ जण व्हेंटिलेटवर आहेत. कोणत्या वयोगटात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे किती रुग्ण आहेत? पाहूयात .

पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचं थैमान

0 ते 9 या वयोगटातील 4 मुली आणि 7 मुलांना जीबी सिंड्रोमची लागण

10-19 वयोगटातील 4 मुली आणि 8 मुलं

20 ते 29 या वयोगटातील 1 महिला आणि 6 पुरुष

30 ते 39 वयोगटातील 3 महिला 5 पुरुष

40 ते 49 वयोगटातील 3 महिला आणि 5 पुरुष रुग्ण

50 ते 59 वयोगटात 2 महिला आणि 5 पुरुष

60 ते 69 वयोगटातील 3 महिला आणि 4 पुरुष

70 ते 79 वयोगटातील 1 महिलेला हा आजार झाला आहे.

गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. तर दुषित पाण्यामुळे हा आजार होत असल्यांच सामोर आल्यानं पुणे महापालिकेने टास्क फोर्सची स्थापना करत पाण्याचे नमुने तपासायला सुरुवात केलीय. पुणे महापालिका परिसरात 11, पुणे ग्रामीणमध्ये 33, तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 आणि 3 रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत... त्यामुळे पुणेकरांचं टेन्शन वाढलंय.. मात्र या गुइलेन बॅरी सिंड्रोमपासून वाचवण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी? पाहूयात.

हे करा, गुइलेन बॅरी सिंड्रोम टाळा

पाणी उकळून थंड करून प्या

शौचास गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणाने हात स्वच्छ धुवा

भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा

मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा

कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा

गुईलेन-बॅरे सिंड्रोम हा आजार शरीरातील नसांवर परिणाम करतो. त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटायला लागले असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बौद्धभूमी फाउंडेशन प्रकरणात मोठी अपडेट; श्रीकांत शिंदेंनी KDMC आणि MMRDA ला दिले सखोल चौकशीचे आदेश

कर्जमाफीच्या अटी, शेतकऱ्यांसाठी कटकटी; केवळ 17 लाख शेतकऱ्यांनाच संपूर्ण कर्जमाफी?

'मोदींचे सरकार जाणार, आणीबाणी येणार'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Fact Check: शाहरूख खान कॉकरोच जनता पार्टीत जाणार? लवकरच पार्टी जॉईन करण्याची घोषणा?

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT