
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचं थैमान पाहायला मिळत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ५९ रूग्णांपैकी ३३ रूग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील, ११ महापालिका हद्दीतील आणि १२ पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील आहेत. तर ३ इतर जिल्ह्यातील आहेत. या आजारामुळे पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. हा आजार व्हायरल संसर्ग नसून, जास्त काळजी घेण्याचं कारण नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं होतं.
हा आजारापासून संरक्षण होण्यासाठी पुण्यातील आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. 'जलजन्य आजार टाळण्यासाठी आपण जी काही काळजी घेतो, तशीच काळजी घ्यावी लागेल. स्वयंपाकासाठी पाणी शुद्ध वापरावे. अन्न ताजे आणि गरम खावे. पाणी स्वच्छ प्यावे. याशिवाय बाहेरील फास्ट फूड खाणं टाळावे. यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता कमी होते. या उपाययोजना केल्यानंतर निरोगी राहण्यास मदत होईल', अशी माहिती आरोग्य प्रमुखांनी दिली.
तसेच पुण्यामध्ये या आजारावर कंट्रोल करण्यासाठी अधिक रूग्ण आढळलेल्या भागात जवळपास ८५ टीम पाठवण्यात आले आहेत. तसेच टीम मेंबर्स घरोघरी जाऊन अशाच आजाराचे काही संशयित रुग्ण आहेत का? अशी माहिती गोळा करून वेळीच अॅक्शन घेणार आहेत. गुइलेन-बॅरे सिंड्रोमग्रस्त जर रूग्ण आढळले तर, सविस्तर माहिती एका फॉर्ममध्ये भरून घेणार आहेत.
रूग्णांनी कुठलं अन्न खाल्लं होतं? कुठलं पाणी प्यायलं होतं? त्या अनुषंगाने रूग्णांवर उपचार केले जातील. आजार टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायची. याचे पत्रक देखील घरोघरी वाटण्यात येत आहे, असं डॉ नीना बोराडे यांनी माहिती दिली. गुइलेन-बॅरे सिंड्रोम निगडीत काही लक्षणं आढळली तर, तात्काळ जवळच्या वैद्यकीय विभागाशी संपर्क साधा आणि घाबरून जाण्याचं कारण नसल्याचंही आरोग्य प्रमुखांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.