Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Gateway Ferry Closed : गेटवे ते मांडवा बोटसेवा बंद! काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

Mumbai News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा बोटसेवा आज दुपारपासून बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांना पोलिसांनी सहकार्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत

  • मेट्रो मार्गिका-३ आणि नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे

  • सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ते मांडवा फेरी सेवा पूर्ण दिवसासाठी बंद करण्यात आली आहे

  • राजभवन आणि ताज परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई सहाराच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुंबईतील मेट्रो मार्गिका ३ आणि नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्गावरील सर्व प्रवासी बोटींची वाहतूक पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते राजभवन आणि ताज हॉटेल येथे भेट देणार आहेत. या ठिकाणांवरील सुरक्षेच्या दृष्टीने गेटवे परिसर आणि परिसरातील सागरी क्षेत्रात कडक सुरक्षा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या काळात गेटवे ऑफ इंडिया परिसरात कोणत्याही प्रवासी बोटी, फेरी सेवा किंवा जलवाहतुकीला परवानगी दिली जाणार नाही.

या निर्णयामुळे गेटवे ते मांडवा, अलिबाग, मुरुड तसेच इतर किनारी भागांदरम्यानची फेरी सेवा आज दुपार पासून बंद राहणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव लागू असलेल्या या बंदोबस्तात सहकार्य करावे आणि नियोजित बोट प्रवासाचे वेळापत्रक बदलावे. तसेच, अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी प्रवासाची पूर्वतयारी ठेवावी.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या मुंबई भेटीदरम्यान “उद्योग संरेखित आणि नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमाचा शुभारंभ” या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. देशभरातील आयटीआय संस्थांमधून हा कार्यक्रम एकाचवेळी प्रसारित केला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT