Maharashtra Cough Syrup Alert : FDA ची मोठी कारवाई, खोकल्यावरील औषधांचा मोठा साठा जप्त

FDA seizes stock of Cough Syrup: मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १९ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र FDAने खोकल्याच्या औषधावर मोठी कारवाई केली आहे. पुण्यात ‘रेसपिफ्रेश टी आर’ औषधाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
FDA seizes stock of Cough Syrup Pune
FDA seizes stock of Cough Syrup PuneSaam Tv
Published On
Summary
  • मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये १९ बालकांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र FDA सतर्क झालं आहे

  • पुण्यात ‘रेसपिफ्रेश टी आर’ खोकल्याच्या औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला

  • डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय औषध विकणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे

  • राज्यभर औषधांच्या गुणवत्तेची तपासणी आणि सुरक्षा चाचणी सध्या सुरू आहे

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधामुळे १९ बालके दगावल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन (FDA) सतर्क झाल आहे. याच पार्श्वभूमीवर, FDA ने पुण्यात मोठी कारवाई करत रेडनेक्स फार्मसिटीकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उत्पादित केलेल्या खोकल्यावरील 'रेसपिफ्रेश टी आर' (Respifresh TR) या औषधाचा मोठा साठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, FDA कडून कंपन्यांची आणि औषधांची तपासणी करण्यात येत आहे. बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील खोकल्यावरील औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. त्याचबरोबर, मेडिकल स्टोअर्स आणि सरकारी रुग्णालयांमधून खोकल्याच्या औषधांचे नमुने देखील तपासणीसाठी गोळा केले जात आहेत. अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली.

FDA seizes stock of Cough Syrup Pune
Banking Alert News : आरबीआयची सोलापूरमधील बँकेवर मोठी कारवाई, कर्ज, ठेवी आणि गुंतवणुकीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

हुकरे यांनी हे देखील स्पष्ट केले की, मध्य प्रदेशात ज्या औषधाच्या सेवनाने बालके दगावल्याचा संशय आहे, त्या औषधाचा साठा सध्या महाराष्ट्र राज्यात उपलब्ध नाही. दरम्यान, दोन वर्षांखालील लहान मुलांना कोणत्याही प्रकारचे कफ सिरप (खोकल्याचे औषध) दिले जाऊ नये. शिवाय 'सिरप' प्रवर्गातील औषध डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन- चिट्ठी शिवाय विक्री करू नये, अशी सूचना राज्य अन्न व औषध विभागाने सर्व किरकोळ औषध विक्रेत्यांस दिली आहे. औषधे डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय विक्री केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.

FDA seizes stock of Cough Syrup Pune
ITR Refund Update : ITR प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही खात्यात रिटर्न जमा झाला नाही? जाणून घ्या ७ सोप्या स्टेप्स

त्यामुळे पालकांनी आणि डॉक्टरांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सध्या अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम राज्यभर सुरू असून, खोकल्याच्या औषधांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे गिरीश हुकरे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com