Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: गणेशोत्सवातली विद्युत रोषणाई जिवावर बेतली; शॉर्ट सर्किटच्या आगीत तरुणानं गमावला जीव

Man Dies Ganpati Decoration: गणेशोत्सवासाठी घराला केलेल्या डेकोरेशनता स्पोट होऊन एका तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झालाय.

साम टिव्ही ब्युरो

Pune Fire News:

घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या सेवेत भाविक तल्लीन झालेत. सर्वत्र रांगोळी, मोदक, पेढे आणि विद्युत रोषणाईने झगमगाट झालीये. मात्र पुण्याच्या खेड तालुक्यातील एका घरात याच लायटींगने मोठी दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी घराला केलेल्या डेकोरेशनचा स्पोट होऊन एका तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खेडमधील बुद्रुक येथील दत्तनगर येथे राहणाऱ्या वैभव गरुड या ३५ वर्षीय तरुणाचा आगीत होरपळून मृ्त्यू झाला आहे. खेड पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैभवच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.

वैभव हा परिसरात सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता. त्याने आपल्या घरी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापणा केली होती. तसेच संपूर्ण घरात विद्युत रोषणाई केली होती. रात्री तो घरी एकटाच झोपला होता. यावेळी घरात अचानक स्पोट झाला आणि आग लागली या आगीत तरुणाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

पतीच्या निधनाने पत्नीवर दोन मुलींची जबाबदारी आहे. ऐन गणेशोत्सवात ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: नवरा बायकोचं लग्नानंतर बोलणं कमी झालंय? 'या' टिप्स करा फॉलो, नातं होईल घट्ट

Bhakri Making Tips : भाकरी थापताना तुटते? टेन्शन घेऊ नका, फक्त 'या' सोप्या टिप्स वापरा

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

SCROLL FOR NEXT