सचिन गाड
मुंबईच्या मुलुंडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची प्रकार समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून तसेच आईला जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला गेला आहे.
मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी सामुहिक बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह नोंद केला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरूणाला अटक करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक परराज्यात रवाना झाले आहे. गुंगीच औषध देऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे एफआयआरध्ये नमुद करण्यात आले आहे.
पैसे दिले नाही म्हणून आरोपी मुलीला घरी घेऊन गेले होते. तिथे दारू पाजून तसेच पेयामध्ये गुंगीचं औषध देऊन तिच्यावर सुरुवातीला आरोपीने बलात्कार केला.
नंतर चाकूचा धाक दाखवून आईला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.