Railways announce special trains between Madgaon-LTT and Chiplun-Panvel for Ganeshotsav 2026 AI Image
मुंबई/पुणे

Railway News : कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी २ विशेष रेल्वेची घोषणा, कुठून कधी धावणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Ganeshotasv Special Railway News : गणेशोत्सव २०२६ साठी कोकण रेल्वेने मडगाव-LTT विशेष ट्रेन आणि चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमूची घोषणा केली आहे. वेळापत्रक, फेऱ्या आणि थांबे जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने दोन विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या आहेत

  • मडगाव-LTT विशेष ट्रेन १५, १६, १८ आणि १९ सप्टेंबरला ये-जा करणार

  • चिपळूण-पनवेल अनारक्षित मेमू १० ते १४ आणि १८ ते २७ सप्टेंबरदरम्यान धावणार

  • मडगाव-LTT विशेष ट्रेनचे आरक्षण ८ सप्टेंबरपासून सुरू होणार

अनेकदा गणेशोत्सव काळात गावी जाण्यासाठी प्रवासी रेल्वेचा मार्ग अवलंबतात. मात्र तिकिटाच्या गैरसोयींमुळे रेल्वेने जाण्याची त्यांची संधी हुकते. यामुळे दरवर्षी सरकारकडून अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात. यंदाही कोकणात गावी जाताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्यानुसार मडगाव - लोकमान्य टिळक टर्मिनस आणि चिपळूण पनवेल अनारक्षित अशा २ गाड्यांच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य नागिरकांना दिलासा मिळाला असून गर्दीची कटकट आता कायमची संपली आहे. या ट्रेनचं शेड्युल पुढील प्रमाणे असेल.

मडगाव-एलटीटी स्पेशल

कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, मडगाव -LTT ही रेल्वे १५ आणि १८ सप्टेंबर रोजी मडगाववरून दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. पुन्हा परत येताना ती रेल्वे १६ आणि १९ सप्टेंबर रोजी एलटीटीवरून सकाळी ७ वाजता रवाना होईल आणि रात्री ११:४५ च्या दरम्यान गंतव्य स्थानापर्यंत पोहचेल. ही रेल्वे एकूण १९ डब्ब्यांची असणार आहे. तसेच तिकीट बुकिंग करायची झाल्यास त्याचे आरक्षण येत्या ८ सप्टेंबरपासून प्रवाशांना करता येणार आहे.

चिपळूण-पनवेल मेमूची सुविधा

मडगाव - LTT सोबतच दुपारच्या सुमारास चिपळूण ते पनवेलदरम्यान अनारक्षित मेमू लोकल चालवण्यात येणार आहे. ही मेमू १० ते १४ सप्टेंबर आणि १८ ते २७ सप्टेंबर दरम्यान चिपळूणवरून सकाळच्या सुमारास ९ वाजता सुटेल आणि दुपारी २:३० वाजता पनवेलला पोहचेल. पनवेलवरून ही रेल्वे परतीच्या प्रवासासाठी ३:३० ला निघेल आणि रात्री १०:२० पर्यंत गंतव्य स्थानकावर पोहोचेल.

रेल्वेचे थांबे पुढील प्रमाणे

चिपळूणवरून सुटणारी पनवेल मेमू रेल्वे ही अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा आणि पेण या स्थानकांवर थांबेल. त्यामुळे चिपळूण ते पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच या मेमूचा सर्वाधिक फायदा स्थानिक नागरिकांना होणार आहे. गणेशोत्सवासाठी सुरु केलेली ही रेल्वे प्रवाशांसाठी नियमित करावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बोरीवलीतील ‘छोटूस किचन’मध्ये अस्वच्छतेचा आरोप

Plank Exercise: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिट करा प्लँक एक्सरसाइज, मिळतील हे ७ फायदे

World Heart Day: ब्लॉकेज कमी होतील आणि हार्ट अटॅक येणारच नाही! ही 1 भाजी करेल तुमच्या नसा साफ

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2026 मध्ये ‘या’ राज्यांनी वाढवला DA, तुमच्या राज्याचा नंबर आहे का?

Baramati Crime: बारामती हादरली! मध्यरात्री २ महिलांसोबत भयंकर घडलं, घरातील दृश्य पाहून सर्वजण घाबरले

SCROLL FOR NEXT