Railway News : रेल्वेचा सर्वात मोठा नियम लागू! ट्रेनमध्ये मोबाईलवर गाणी किंवा व्हिडिओ पाहिला तर होईल तुरुंगवास

Railway News Update : रेल्वे प्रवासात मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, रील्स पाहणे किंवा मोठ्याने फोनवर बोलणे महागात पडू शकते. याबाबत रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.
railway new rules
railway new rules AI Image
Published On: 
Summary
  • रेल्वे प्रवासात मोठ्या आवाजात गाणी ऐकणे आणि व्हिडिओ पाहणे टाळावे.

  • मोठ्याने फोनवर बोलणे किंवा मोठ्या आवाजातील रिंगटोन सहप्रवाशांना त्रासदायक ठरू शकते.

  • नियम मोडल्यास ५००० रुपये दंड होऊ शकतो

प्रवासादरम्यान वेळ घालवण्यासाठी आपण मोबाईल स्क्रोल करतो. कधी गाणी ऐकतो तर कधी अशीच रिल्स बघत प्रवास संपण्याची वाट पाहतो. मात्र आता प्रवासादरम्यान जर तुम्ही मोबाईलच्या गाण्यांचा आवाज जास्त वाढवला आणि त्याचा त्रास इतर प्रवाशांना झाला तर त्याचा भुर्दंड तुम्हाला बसू शकतो. कारण रेल्वेने प्रवास करताना मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे, रील्स पाहणे किंवा मोठ्याने फोनवर बोलणे अशा प्रकारांवर आळा बसवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने म्हटले आहे की, रेल्वे प्रवासादरम्यान काही प्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावतात, व्हिडिओ पाहतात किंवा मोठ्याने फोनवर बोलतात. अनेकदा मोबाईलची रिंगटोनही मोठ्या आवाजात वाजते. अशा प्रवाशांमुळे रेल्वेतील इतरांना त्रास होतो. त्यामुळे अशा त्रास देणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे कायद्याच्या कलम 145 अंतर्गत कारवाई करण्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे.

railway new rules
Weather Update : राज्यात पुन्हा पावसाच्या सरी, १२ जिल्ह्यांना यलो अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

पहिल्यांदा नियम मोडल्यास एक हजार रुपयांचा दंड, तर पुन्हा नियम मोडल्यास ५००० रुपयांपर्यंत दंड किंवा ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. तसेच दंड आकारून ट्रेनमधून उतरवण्यात येणार,असं म्हटलं आहे.

railway new rules
Water Crisis : राज्यात पाणीसाठ्यात मोठी घट! धरणांमध्ये केवळ ७०.५३ टक्के जलसाठा; तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती? वाचा

प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी?

रेल्वे प्रवासात मोबाईल सायलेंट किंवा व्हायब्रेशन मोडवर ठेवावा. गाणी, व्हिडिओ आणि रील्स पाहण्यासाठी इयरफोनचा वापर करावा. फोनवर बोलताना आवाज मर्यादित ठेवावा आणि अनावश्यकपणे लांब संभाषण टाळावे. इतर प्रवाशांना त्रास होत असल्यास संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांकडे किंवा रेल मदत ॲपवर तक्रार नोंदवता येते. रेल्वे हा सार्वजनिक प्रवासाचा पर्याय असल्याने प्रत्येकाने सहप्रवाशांच्या सोयीचा विचार करणे आवश्यक आहे. थोडीशी शिस्त आणि जबाबदारी दाखवल्यास सर्वांचा प्रवास अधिक शांततापूर्ण आणि सुखकर होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com