Saam Tv
केमिक्ल्सयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी काही सोप्या आणि नैसर्गिक घरगुती उपायांच्या मदतीने हातांवरील टॅन अगदी सहज आणि सुरक्षितपणे घालवता येऊ शकता.
एका वाटीत दही घेऊन त्यात १ चमचा हळद पावडर मिसळा. ही पेस्ट हातावर टॅन झालेल्या भागावर लावा आणि २० मिनिटांनी धुवून टाका.
कोमट लिंबाच्या रसात आपले टॅन झालेले हात सुमारे २० मिनिटे बुडवून ठेवा, त्यानंतर थंड पाण्याने हात धुवून घ्या. लिंबाचा रस आम्लयुक्त असल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते, म्हणूनच यानंतर मॉइश्चरायझर नक्की लावा.
ताजा कोरफडीचा गर हातावर लावा आणि तो रात्रभर तसाच राहू द्या. सकाळी उठून हात धुवून टाका.
काकडीच्या रसामध्ये थोडे थेंब लिंबाच्या रसाचे मिसळा. यामध्ये हळद पावडर घालून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट हातावर अर्धा तास लावून ठेवा आणि नंतर धुवून टाका.
५ ते ६ बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे बदाम दूधामध्ये वाटून त्यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट हातावर लावून रात्रभर तशीच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवून टाका.
चंदन पावडर आणि हळद पावडर एकत्र करून त्यात गुलाबाचे दोन-तीन थेंब मिसळा. यांची घट्ट पेस्ट तयार करून हातावर लावा. ही पेस्ट ३० मिनिटे तशीच राहू द्या आणि नंतर धुवून टाका.
टोमॅटोचा गर आणि दही एकत्र करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावून २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवून टाका.
NEXT : ATM मशीनची बटनं नेहमी मेटलचीच का असतात? कारण वाचून धक्का बसेल