Tadasana Benefits: ऑफिसमध्ये एका जागी बसून काम केल्यामुळे पाठ खूप दुखते? मग १० मिनिटांसाठी करा 'हा' सोपा योगा

Shruti Vilas Kadam

ताडासन

ताडासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहून दोन्ही पाय जवळ ठेवा. हात डोक्याच्या वर नेऊन तळहात एकमेकांत गुंफा आणि तळपायांवर उभे राहत शरीर वरच्या दिशेने ताणा. या स्थितीत १० ते २० सेकंद राहून सामान्य श्वास घ्या. सुरुवातीला ३ ते ५ वेळा हा सराव करा. शरीराची क्षमता वाढल्यानंतर वेळ हळूहळू वाढवा.

Tadasana Benefits

शरीराचा पोश्चर सुधारते

ताडासनामुळे शरीर सरळ ठेवण्याची सवय लागते आणि बसताना-उभे राहताना पोश्चर सुधारण्यास मदत होते.

Tadasana Benefits

पाठीच्या कण्याला आधार

शरीर ताणल्यामुळे पाठीचा कणा आणि आसपासच्या स्नायूंना योग्य स्ट्रेच मिळतो. त्यामुळे पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

Tadasana Benefits

शरीराचा समतोल सुधारतो

ताडासन करताना शरीराचे संतुलन राखावे लागते, त्यामुळे बॅलन्स आणि स्थिरता सुधारण्यास मदत होते.

Tadasana Benefits

पायांचे स्नायू मजबूत होतात

पायांवर शरीराचे वजन संतुलित केल्यामुळे पाय आणि घोट्यांच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. त्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.

Tadasana | Yandex

एकाग्रता वाढण्यास मदत

ताडासन करताना श्वास आणि शरीराच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करावे लागते, त्यामुळे मन शांत आणि एकाग्र होण्यास मदत होते. तसेच शरिरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दिर्घ श्वासोश्वास करावा लागतो यामुळे श्वसनाचे त्रास दूर होतात.

Tadasana | Yandex

लवचिकता वाढते

हात वर नेऊन संपूर्ण शरीर ताणल्यामुळे शरीरातील विविध स्नायूंना स्ट्रेच मिळतो. यामुळे शरिराचा लवचिकता वाढते.

Tadasan | Canva

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tadasan | Canva

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Veg Kolhapuri Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा