Maharashtra News Live Update: शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मेळावा महत्त्वाचा ठरणार

Marathi Breaking Live Headlines Updates : कोल्हापूर गोकुळ निकाल,टायगर श्रॉफ, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, महाराष्ट्रात पावसाचा इशारा, नवरात्रौउत्सव, राज्यातील काही जिल्ह्यात पावसाचा इशारा, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News
Published On: 

पिंपरी चिंचवड शहराला संध्याकाळी परतीच्या पावसाच्या तडाखा

पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळी परतीच्या मान्सून पावसाचा तडाखा बसला. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरी चिंचवडकर यांची चांगलीच ताराबड उडाली. तर अचानक आलेला पावसामुळे शहरात ऑक्टोंबर हिट पासून हैरान झालेल्या पिंपरी चिंचव करांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी अचानक संध्याकाळी पाऊस आल्याने शहरात दांडिया खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची थोडी हिरमोड झालेली पाहायला मिळाली.

पुण्यात संतप्त आंदोलकांकडून ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

आज पुण्यात,पाषाण येथे शेकडो तरुण - तरुणी, विद्यार्थी आणि नागरिकांनी एकत्र येत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले व " आज का रावण" ज्ञानेश कुमार "लोकतंत्र का हत्यारा" ज्ञानेश कुमार, "ज्ञानेश कुमार हटवा, लोकशाही वाचवा "अशा घोषणा देत ज्ञानेश कुमार यांचा रावण रुपी प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला. ११ ऑक्टोबर पासून याठिकाणी सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर व ऍडव्होकेट श्री कीर्ती काळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन चालू होते.

प्रदिप पुर्णेकर हत्याप्रकरणी ⁠राजेंद्र शिंदेंची ६ तास चौकशी

प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदे यांची चौकशी झाली. तब्बल ⁠६ तास चौकशी झाली.

आरोपी संतोष टल्ली आणि अमित पपलूसमोर बसवून चौकशी करण्यात आली.

⁠

CJP चे आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या न्यायालयीन कोठडीत 2 दिवसांची वाढ

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी कोठडीची मुदत वाढवण्याचा घेतला निर्णय

जामीनासाठीच्या कागदपत्रांमध्ये कमतरता असल्याने न्यायालयीन कोठडीत वाढ

5 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांना SEM कोर्टात हजर करण्यात आले होते.

अमरावतीतील बाळ विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करा –भाजपची मागणी

अमरावतीत अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर नवजात बाळाच्या कथित विक्रीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रफुल्ल भोजने आणि त्यांच्या पत्नी डॉ. वैशाली भोजने यांच्यावर भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी गंभीर आरोप केले.संबंधित दाम्पत्य रुग्णालयाला कुलूप लावून फरार झाल्याचा दावा त्यांनी केला. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत का,याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी,अशी मागणी त्यांनी केली.दत्तक देण्याच्या नावाखाली बाळांची विक्री,अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या कथित प्रकारांचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली.

पुण्यात पावसाच्या हलक्या सरी

अचानक आलेल्या सरींमुळे पुणेकरांची मात्र चांगलीच तारांबळ

पुण्यासह राज्यात काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता

रांजणगावच्या स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे मोठे लोट पसरले आहेत. गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ज्वलनशील साहित्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे ठाण्यात निधन

ठाण्यातील आधुनिक भारत परिवार' या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ठाण्यातील प्रसिद्ध बहुजन नेते कर्मवीर सुनील खांबे यांचे नुकतेच ठाणे येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील एका आक्रमक, डॅशिंग आणि वंचित घटकांसाठी लढणाऱ्या खंबीर नेतृत्वाला सामाजिक चळवळीने गमावले आहे. परवा त्यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. आज त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; भातशेतीचे नुकसान होण्याची भीती

रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. दिवसभर ऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरणानंतर रत्नागिरी, लांजा परिसरात मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी भातशेतीची चिंता वाढली आहे.

अमरावती बाळ विक्री प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि तात्काळ कारवाई केली जाईल - मेघना बोर्डीकर

अमरावती येथील बाळ विक्री प्रकरणाची सखोल चौकशी होईल आणि तात्काळ कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. त्या नांदेडमध्ये बोलत होत्या. ती माता अल्पवयीन होती अशी माहिती आहे.या प्रकरणात जे कोणी असेल त्यांना सुटका मिळणार नाही.

अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान गरबा मंडळात गेल्यामुळे विश्व हिंदू परिषदेकडून मंडळाचं शुद्धीकरण

नागपुरात मनीष नगर येथे आयोजित नगाडा येथील गरबा मंडळात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान हे गेल्यामुळे विश्व हिंदू परिषदेकडून गरबा मंडळात शुद्धीकरण केलं

मेघना बोर्डीकर यांच्या नारी शक्ती संवाद यात्रेचा माहूर गडावर समारोप

राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या तुळजापूर ते माहूर या नारी शक्ती संवाद यात्रेचा आज समारोप झाला. माहूर गडावर रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्यांनी यात्रेची सांगता केली. यापूर्वी त्यांनी नांदेड आणि माहूर येथे महिलांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, गाड्यांचा ताफा गडावर न नेता त्या एसटी बसने गडावर पोहोचल्या. यंदाच्या दुष्काळातून लाडक्या बहिणी, वृद्ध, शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांना सावरण्याची शक्ती मिळावी, असे साकडे देवीला घातल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण रायगडात दुष्काळ जाहीर करा; जिल्हा नियोजन समिती बैठकीत ठराव

रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर करा असा ठराव रायगडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. यावेळी जिल्ह्यातील पिक परिस्थितीबाबतचा आढावा घेत चिंता व्यक्त करण्यात आली.

नांदेडमध्ये बळीराजाची आत्महत्या, मृत्यूपूर्वी व्हिडिओ व्हायरल 

नांदेड तालुक्यातील बोरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शंकर आबानराव क्षीरसागर (वय ४६) यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. पावसाचा दीर्घ खंड, हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान आणि वाढता कर्जाचा भार यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर भावूक व्हिडिओ पोस्ट करत शासन-प्रशासनाच्या धोरणांबाबत संताप व्यक्त केला.

रायगडमध्ये दोन महिन्यांनंतर पावसाची हजेरी; महाड तालुक्यात जोरदार सरी 

रायगडच्या दक्षिण भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. महाड तालुक्यातील विन्हेरे विभाग आणि बिरवाडी परिसरात पावसाने हजेरी लावली. सुमारे दोन महिन्यांच्या खंडानंतर पाऊस बरसल्याने परिसरात पावसाचे आगमन झाले आहे. अचानक झालेल्या पावसामुळे स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळाचे सावट; शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम रद्द 

शिंदे गटाचा मुंबईतील नेस्को सेंटर येथे होणारा दसरा मेळावा यंदा साधेपणाने पार पडणार आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा सेलिब्रिटींचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यावेळी थेट भाषणांवर भर असून, अवघ्या २ ते अडीच तासांत मेळावा संपवण्याचे नियोजन आहे

Gokul Election : 'गोकुळ'च्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलची मुसंडी

  • गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारली

  • सतेज पाटील यांच्या पॅनलची सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल

  • सतेज पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

नंदुरबारमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली! ऑक्टोबरमध्येच भूजल पातळी दीड मीटरने घटली

नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण घटल्याने दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असून, पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातच जिल्ह्यातील भूजल पातळीत दीड मीटरने घट झाली असून, तलाव आणि विहिरींनीही तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.

Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा उद्या गोरेगाव नेस्को सेंटर येथे दसरा मेळावा

शिंदेंच्या शिवसेनेचा उद्या, मंगळवारी गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे दसरा मेळावा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आज संध्याकाळी नेस्को सेंटरची पाहणी करणार आहेत.

मंत्री योगेश कदम, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, मुरजी पटेल घेणार तयारीचा आढावा

दुष्काळग्रस्त शेतक-यांना हेक्टरी एक लाखाची मदत मिळावी यासाठी कॉंग्रेसचे धरणे आंदोलन

नाशिकच्या येवला तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आज येवला तहसिलवर धरणे आंदोलन करण्यात आले.

येवला तालूक्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी तसेच शेतक-यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिका-यांनी तहसिलवर आंदोलन करत मागण्यांचे निवेदन दिले.

सरकारने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

गोकुळ निवडणुकीत महायुती आणि सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीत काटे की टक्कर; माजी चेअरमन पिछाडीवर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुती आणि सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीत जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. सर्वसाधारण गटात महायुतीचे १२, तर समविचारी आघाडीचे ८ उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि विश्वास पाटील हे दोघेही पिछाडीवर असून, ते महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.

शिंदेंच्या दसरा मेळाव्याबाबत मोठा निर्णय; लांबच्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचे आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उद्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये दसरा मेळावा पार पडणार आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावखेड्यातून आणि दूरच्या जिल्ह्यांतून कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी मुंबईत येऊ नये, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

शरद लाड यांच्या भविष्यातील जबाबदारीची काळजी घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन 

सांगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद लाड यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. शरद लाड यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले असून, उमेदवारीच्या चर्चेत त्यांचे नाव प्रामुख्याने होते, असे फडणवीस म्हणाले. निवडणुकीची जबाबदारी स्वतःवर सोडण्याची भूमिका शरद लाड यांनी घेतल्यानंतर पक्षाने चर्चा करून निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नालासोपारा लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; आरोपीविरोधात सहावा गुन्हा दाखल

नालासोपारा लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक असलेल्या आरोपी आरिफ शेख याच्याविरोधात सहावा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पाच लैंगिक अत्याचाराचे, तर एक धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा असल्याची माहिती आहे. डेटिंग ॲपच्या माध्यमातून मुलींना जाळ्यात ओढून, विविध आमिषे दाखवत लैंगिक अत्याचार केल्याचा आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे दसरा मेळाव्यासाठी समाजाला आवाहन; म्हणाले, ‘मी समाजाशिवाय जगू शकत नाही’

जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देत समाजबांधवांना मोठ्या संख्येने नारायण गडावर येण्याचे आवाहन केले. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून बांधवांकडून जेवण-पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून, कोणीही पैशांच्या स्वरूपात मदत करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

बच्चू कडूंची पोलिसांना जाहीर शिवीगाळ

प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलीस नाहक त्रास देत असल्याचा आरोप करत शिवसेना नेते बच्चू कडू यांनी पोलिसांवर खालच्या पातळीवर टीका केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा पुलावरून सुरू झालेल्या इशारा मार्चची घुग्गुस शहरातील कारगिल चौकात सांगता झाली. जवळपास १५ किलोमीटरचा पायी प्रवास करत बच्चू कडू यांनी पूर्ण केला. यावेळी झालेल्या समारोपीय भाषणात त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलीस वेकोलीकडून पैसे घेत असून प्रकल्पग्रस्त आंदोलकांना धमकावत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला. दरम्यान, पोलिसांवर टीका करताना त्यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेमुळे या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

हडपसरमध्ये दूषित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; ठाकरे गटाचे नगरसेवक नितीन गावडे आक्रमक

पुणे शहरातील हडपसर गाव, गोंधळेनगर, काळेपडळ आणि लक्ष्मी कॉलनी परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते व नगरसेवक नितीन गावडे यांनी असंख्य नागरिकांसह हडपसर क्षेत्रीय कार्यालय गाठत महापालिका प्रशासनाला जाब विचारला.नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करत गावडे यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. “आम्हाला शुद्ध पाणीपुरवठा न झाल्यास येत्या काळात तुम्हालाही हेच दूषित पाणी पाजले जाईल,” असा आक्रमक इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

महायुतीचे 14 उमेदवार आघाडीवर तर समविचारी आघाडीचे 6 उमेदवार आघाडीवर

गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे मोठ्या मतांनी पिछाडीवर

तिसऱ्या फेरी अखेर महायुतीचे अशोक चरटी, प्रताप पाटील कावणेकर, एस आर पाटील, अमर पाटील, अरुण डोंगळे, कर्णसिंह गायकवाड पिछाडीवर

तर समविचारी आघाडीचे सर्वसाधारण गटातील शशिकांत पाटील- चुयेकर, विद्याधर गुरुबे, बाबासाहेब चौगले, किसन चौगले, राहुल देसाई, अभिजीत तायशेटे आघाडीवर

राज्य सरकारच्या विरोधात आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कंत्राटदारांचे आंदोलन

मागील दोन वर्षात 9 कंत्राटदरांनी थकीत बिल मिळाली नसल्याने आत्महत्या केल्याचा दावा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने केला आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारकडे 86 हजार कोटींचे बिले थकीत असल्याने हे आंदोलन करण्यात येत आहे.

यामध्ये सार्वजनिक बांधकाम,ट्रायबल, पर्यटन,जलसंपदा,ग्रामविकास,जलजीवन मिशन या विभागांचा समावेश आहे.

दरम्यान, दिवाळीअगोदर सर्व बिल मिळाली नाही तर राज्यभर रास्तारोको करण्याचा इशारा शासकीय कंत्राटदरांकडून देण्यात आला आहे.

जयसिंगपूरजवळील दानोळीत गोळीबार, महेश दळवी यांची निर्घृण हत्या

गोळीबार, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराची हत्या

जयसिंगपूरजवळील दानोळी गावात महेश दळवी याच्यावर गोळ्या झाडून हत्या

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना

बदलापुरात जुन्या वादातून तरुणाची हत्या गणेश यादव असं मृत तरुणाचं नाव

बदलापुरात जुन्या वादातून एका तरुणाची कुऱ्हाडीनं हल्ला करत हत्या करण्यात आली. तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झालाय.

गणेश यादव असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. त्याचे अमन सिंग आणि अभिषेक सिंग यांच्याशी जुने वाद होते. रविवारी मध्यरात्री गणेश हा त्याचा मित्र अबू हलाल शेख याच्यासोबत रमेशवाडी शिवसेना शाखा परिसरात बसलेला असताना 10 ते 12 जणांनी त्यांच्यावर कुऱ्हाड, कोयते आणि धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात गणेश यादव याचा मृत्यू झाला. तर त्याचा मित्र अबू हलाल शेख गंभीर जखमी झालाय. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करत 2 आरोपींना अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पुढील तपास करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे कळवा मुंब्रा विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी

एक व्यक्ती माझ्या घराबाहेर उभा असल्याचे बोलून मला फोन द्वारे अर्वाच्या भाषेत बोलत असल्याचे आव्हाडांनी Ex ट्विट करत दिली माहिती...

यापूर्वीही आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या घराजवळ बॉम्ब असल्याचे त्यांना e मेल द्वारे सांगून देण्यात आली होती धमकी..

कोल्हापूर गोकुळ दूध संघ निवडणूक: महायुतीची १७ जागांवर घसघशीत आघाडी; सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीचे ३ उमेदवाराची आगेकूच 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या मतमोजणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून, सर्वसाधारण गटातील २० पैकी तब्बल १७ जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे, आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे ३ उमेदवार देखील या लढतीत टिकून असून आघाडीवर आहेत. यामध्ये समविचारी आघाडीकडून अभिजित टायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर आणि राहुल देसाई हे तीन प्रमुख उमेदवार आगेकूच करत आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांवरून राजकीय वातावरण तापले असून, गोकुळच्या सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये अत्यंत अटीतटीची पाहायला मिळत आहे.

गोळीबाराच्या घटनेचे राजकीय भांडवल करू नका; संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर

अभिनेता टायगर श्राॅफ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. या टीकेला शिवसेना (शिंदे गट) नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

रोज सकाळी देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात काही अर्थ नाही. त्याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. ज्या कोणी गोळीबार केला असेल त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे. अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ही दक्षता सरकार म्हणून नक्की घेतली जाईल."

वाळू उपसा, रसायनयुक्त पाणी गिरणा पात्रात सोडल्याने हजारो माशांचा मृत्यू

जळगाव शहरानजीक गिरणा नदीपात्रात बांभोरी पुलाच्या परिसरात हजारो माशांचा अचानक मृत्यू होतो आहे. रसायनमिश्रित पाणी आणि ऑक्सिजन निर्मितीची साखळी खंडित झाल्याचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बांभोरी पूल रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने एका बाजूने कच्चा मातीचा बंधारा बांधण्यात आला आहे. पुलाच्या पिलरजवळ नव्याने उभारणी करण्यात येणाऱ्या पुलासाठी पिअरसाठी खड्डे करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी अडवण्यात आले आहे. मात्र, पुढे गेलेल्या पाण्यात मासे अचानक मरून काठाला आले.

माजी मंत्री दिलीप वळसे-पाटलांचा एसटीने २० किलोमीटर प्रवास; मंचर आगारात पाच नव्या बस दाखल!

ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीच्या प्रवासाचा अनुभव माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतलाय. मंचर एसटी आगारात दाखल झालेल्या पाच नवीन बसचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आणि त्यानंतर त्यांनी मंचर ते पारगाव असा २० किलोमीटरचा प्रवास केला.

मंचर एसटी आगारात पाच नवीन बस दाखल झाल्या असून, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलं. यानंतर वळसे-पाटील यांनी स्थानिक नेत्यांसोबत एसटीने मंचर ते पारगाव असा २० किलोमीटरचा प्रवास केला. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दळणवळणाचं महत्त्वाचं साधन असलेल्या एसटीने प्रवास करत त्यांनी लालपरीच्या प्रवासाचा अनुभव घेतला.

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुरतच्या दिशेने रवाना

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट आरोपी सुरतच्या दिशेने रवाना

अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी मुंबईतून सुरतच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.

आरोपी टॅक्सीने सुरतच्या दिशेने गेल्याची माहिती समोर येत असून, या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वादावर पडदा

चंद्रपुरातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता संपुष्टात येण्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईतील बैठकीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन्ही गट एकत्र येऊन जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच विजय वडेट्टीवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयोजित केलेल्या भाऊच्या दांडिया उत्सवात उपस्थिती लावली. दिवंगत खासदार सुरेश धानोरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. याप्रसंगी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचे मंचावर स्वागत केले.

27 वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 27 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेतला. मयुरी सुनील मखरे असं या विद्यार्थिनीचं नाव असून, ती श्रीगोंदा शहरातील दत्तवाडी परिसरात राहत होती. मयुरी ही एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती. काल सकाळी सात ते आठ वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान तिने राहत्या खोलीतील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचं समोर आलं. मयुरीच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद....

पिंपळगाव बायपासवर कारची शिक्षिकेच्या दुचाकीला धडक

यवतमाळच्या पिंपळगाव बायपासवर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिक्षिका निशा फुंदे ह्या गंभीर जखमी झाल्या.विरुद्ध दिशेने आलेल्या कारने दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत नेली. सकाळी शाळेत जात असताना हा भीषण अपघात घडला. जखमी शिक्षिकेला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताचा संपूर्ण थरार रस्त्यालगतच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी शहर पोलिसांनी कारचालक डॉ. किशोर टोंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 27 वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास

अहिल्यानगरच्या श्रीगोंदा शहरात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या 27 वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास...

मयुरी सुनील मखरे असं या विद्यार्थिनीचं नाव असून, ती श्रीगोंदा शहरातील दत्तवाडी परिसरात राहत होती.

Dadar Kohinoor : दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये एका होटेलला किचनला आग

दादरच्या कोहिनूर स्क्वेअरमध्ये एका होटेल किचनला आग लागली होती

यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

होटेल बंद होतं

Gokul Election Result : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला सुरुवात

गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला सुरुवात

मत पत्रिकेंवर क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणा झाल्याची शक्यता

पॅनल टू पॅनल मतदाना ऐवजी क्रॉस वोटिंगला मतदारांनी दिली पसंती

दोन वाजण्याच्या दरम्यान निकाल स्पष्ट होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयवर भव्य आंदोलन

महाराष्ट्रातील कंत्राटदारांचे आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयवर भव्य आंदोलन

राज्यातील विविध विभागांकडील तब्बल ८६ हजार कोटी रुपयांची कंत्राटदारांची देयके प्रलंबित

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदारांचा आंदोलनाचा पवित्रा

कॉंग्रेस शिष्टमंडळ घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

कॉंग्रेस शिष्टमंडळ घेणार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट

फॉर्म 6 मधील गोंधळ समोर आल्यानंतर वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळ दुपारी 12 वाजता घेणार चोकलिंगम यांची भेट

फॉर्म 6 मधील गोंधळ, पात्र मतदारांची वगळलेली नाव आणि संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपाहार्य पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात आक्षेपाहार्य पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उत्तर मुंबईच्या अध्यक्षा फाहेमिदा खान यांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

अक्षय कार्य पोस्ट प्रकरणांमध्ये विकास कांबळे नावाच्या व्यक्ती विरोधात तक्रार

टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर सलमान खानच्या घरावरील सुरक्षा वाढवली

काल रात्री टायगर श्रॉफच्या कारवर हल्ला झाला

या हल्ल्यानंतर सलमान खानच्या घरावरील सुरक्षा वाढवली

पुणे पदवीधर निवडणुकीवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं

पुणे पदवीधर निवडणुकीवरून साताऱ्यात राजकीय वातावरण तापलं...

शिवसेनेच्या नाराजीनंतर आता भाजपमध्ये सुद्धा सर्व काही अलबेल नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ?

दस-याच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलाला मिळतोय अल्पदर

-दस-याच्या पार्श्वभूमीवर मनमाड परिसरात अनेक शेतकरी झेंडू फुलांची लागवड करीत असतात.

मात्र यंदा अल्प पावसामुळे विहिरींना पाणी उतरले नाही.त्यामुळे फुलांची पाहिजे तशी वाढ होऊ शकली नाही

सध्या मार्केट मध्ये शेतकरी फुल विक्रीला घेऊन येत असून त्याला १० ते २१ रुपये किलो असा अल्पदर मिळत आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबाराचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं निषेध

अभिनेता टायगर श्रॉफ च्या वाहनावरील गोळीबाराचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं निषेध

गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई केली जाण्याचे दिले आश्वासन

सोशल मिडिया पोस्ट करून दिली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माहिती

मुंबईतील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं व्यक्त केलं मत

चिखलीचे काँग्रेस माजी आ.राहुल बोंद्रे यांना पोलिसांची नोटीस.

चिखलीचे काँग्रेस माजी आ.राहुल बोंद्रे यांना पोलिसांची नोटीस.

राहुल बोंद्रे चालवत असलेल्या संस्थांची 1993 पासून ची मागितली सविस्तर माहिती.

राहुल बोंद्रे यांनी स्वतः इंस्टाग्राम वर व्हिडिओद्वारे दिली माहिती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.