ST Buses For Konkan  Saam Tv
मुंबई/पुणे

Ganeshotsav 2024: कोकणात जाणाऱ्या एसटी बस फुल्ल; चिंता करू नका ज्यादा बस सोडणार, कुठून सुटणार?

ST Buses For Konkan : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून आणखी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Priya More

गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav 2024) कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मुंबईमध्ये राहणारे कोकणवासीय दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. कोकणामध्ये जाणाऱ्यांची संख्या लक्षात घेता आता एसटी महामंडळाकडून जास्त बसेसची सोय करून देण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांकडून एसटीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ४९५३ बसेस फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून कोकणात जाण्यासाठी ज्यादा एसटी बसेस (ST Bus) उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे ४२०० गट आरक्षणासह एकूण ४९५३ ज्यादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. गणपती उत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ५००० ज्यादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. महत्वाचे म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे.

३ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बसस्थानकातून या ज्यादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी आणि एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते.

यंदा एसटीतर्फे सर्व विक्रम तोडून सुमारे ५००० ज्यादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटी महामंडळाकडून ३ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

एसटी बसची वाहतूक -

मुंबई -

ग्रुप बुकिंग - १५७८

ज्यादा बस बुकिंग - २६३

एकूण - १८४१

ठाणे -

ग्रुप बुकिंग - २०६४

ज्यादा बस बुकिंग - ४१७

एकूण - २४८१

पालघर -

ग्रुप बुकिंग - ५५८

ज्यादा बस बुकिंग - ७३

एकूण - ६३१

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात आज एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद

Success Story: MBBS केलं, नंतर पहिल्याच प्रयत्नात USPC क्रॅक; IPS अधिकाऱ्याची लेक झाली IAS; सौम्या झा यांचा प्रेरणादायी प्रवास

Mangal Gochar: काही तासांनंतर मंगळ करणार बुधाच्या घरात प्रवेश; 'या' 3 राशींवर होणार सकारात्मक प्रभाव

Tuesday Horoscope : नागदेवतेची कृपा होणार; अचानक धनयोग येणार; ५ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस ठरणार फलदायी

Viral Pune Couple Video: दुचाकीवर प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; प्रेमीयुगुलांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT