पावला विठ्ठल माझा...! ST ची झोळी भरली, आषाढी वारीत लाखो वारकरी-भक्तांचा प्रवास, 'लय भारी' कमाई!

Pandharpur Ashadhi Wari 2024: आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एसटीने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या.
ST ला विठ्ठल पावला! आषाढी वारीत ९ लाख ५३ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास
Pandharpur Ashadhi Wari 2024Saam Tv
Published On

एसटी महामंडळाला यंदा विठ्ठल पावला आहे. यंदा आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एसटीने पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान सुमारे ५ हजार विशेष बसेस सोडण्यात आल्या होत्या.

या ५ हजार बसेसव्दारे १९ हजार १८६ फेऱ्यांमधून ०९ लाख ५३ हजार भाविक-प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला असून, यातून २८ कोटी ९२ लाखांचे रुपये उत्पन्न एसटीला मिळाले आहे.

ST ला विठ्ठल पावला! आषाढी वारीत ९ लाख ५३ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास
Mumbai Goa Highway : गणपती बाप्पा मोरया! मुंबई-गोवा महामार्गावरून चाकरमान्यांचा प्रवास सुकर होणार, महत्वाची अपडेट आली समोर

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाडयांचे नियोजन करण्यात आले होते. ५ हजार बसेस वारकऱ्यांच्या प्रवासासाठी एसटीने पंढरपूर येथील वेगवेगळया ४ तात्पुरत्या बसस्थानकांवर तैनात केल्या होत्या.

त्याबरोबरच थेट पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष गाडया सोडल्या होत्या. यात्रेच्या आधी दोन दिवस वाखरी येथील संपन्न झालेल्या रिंगन सोहळयासाठी एसटीकडून २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

ST ला विठ्ठल पावला! आषाढी वारीत ९ लाख ५३ हजार विठ्ठलभक्तांनी केला एसटीतून सुरक्षित प्रवास
Pune Flood Update: पुणे तिथं उणे नको! पुरानंतर CM शिंदेंनी यंत्रणांना नेमके काय आदेश दिले?

प्रवाशांनी एसटीवर दाखवलेल्या प्रचंड विश्वासाला एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक प्ररिश्रमांतून सार्थ ठरवले आहे. यापुढे देखील सर्वसामान्य प्रवासी जनतेला अशाच प्रकारे सुरक्षित, किफायतशीर व सन्मानजनक सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबध्द राहिल, असा विश्वास एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, डॉ.माधव कुसेकर यांनी व्यक्त केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com