Pune Flood Update: पुणे तिथं उणे नको! पुरानंतर CM शिंदेंनी यंत्रणांना नेमके काय आदेश दिले?

CM Eknath Shinde On Pune Flood: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
Pune Flood Update: पुण्यात तातडीने पंचनामे करा, साफसफाईसाठी खासगी कंपनीची मदत घ्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश
CM Eknath Shinde On Pune FloodYandex
Published On

पुणे शहर आणि परिसरात गेल्या ३ दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर (Pune Rainfall) गुरूवार पूरस्थिती निर्माण झाली होती. पुण्यातील अनेक परिसरात पूराचे पाणी शिरले होते. अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने संसारउपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले. आता पुण्यात पूर ओसरला आहे. पण पूरानंतर ठिकठिकाणी गाळ साचला आहे. पुणे महानगर पालिकने पूरग्रस्त भागांमध्ये पंचनामे सुरू केले आहेत. अशामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुण्यातील घरांमध्ये शिरलेला गाळ, चिखल दूर करण्यासाठी युद्धपातळीवर मोहिम हाती घ्यावी. साफसफाईच्या कामासाठी खासगी कंपन्यांची मदत घ्यावी आणि तातडीने पंचनामे करावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी या भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घरांमधील चिखल, गाळ आणि कचऱ्याची महापालिका तसेच साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पुणे जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पुरामुळे घरांचे, शेतीचे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी या भागातील घरामध्ये चिखल साचला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. त्यांनी तात्काळ पुणे जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुण्यातील घरांमध्ये पूरानंतर साचलेला चिखल साफ करण्यासाठी सुमित इंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पूराचे पाणी, चिखल यामुळे परीसरात रोगराई पसरू नये यासाठी महापालिका प्रशासनाने औषधांची फवारणी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिका दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com