Pandharpur News : गोवा सरकार पंढरपुरात बांधणार भक्तनिवास; गुरुपौर्णिमेनिमित्त गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पंढरपुरात

Pandharpur News : पंढरपूरमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. वर्षभर भाविकांची रीघ सुरूच असते. तर आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात
Pandharpur News
Pandharpur NewsSaam tv
Published On

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी येत असतात. प्रामुख्याने आषाढी यात्रेला अधिक गर्दी होत असते. यात गोवा राज्यातून येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते. यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना राहण्याची सोया व्हावी या अनुषंगाने गोवा राज्य सरकार पंढरपूरमध्ये भक्त निवास बांधणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडे जागेसाठी प्रस्ताव दिला जाणार आहे.  

Pandharpur News
Sangli Rain News: अलर्ट! कृष्णामाय भरली, वारणा नदीही पात्राबाहेर, अलमट्टीतून १ लाख क्युसेक विसर्ग सुरु; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पंढरपूरमध्ये (Pandharpur News) लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. वर्षभर भाविकांची रीघ सुरूच असते. तर आषाढी एकादशी निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. देशभरातून भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. गोवा (Goa) राज्यातून लाखो भाविक दरवर्षी आषाढी, कार्तिकीच्या निमित्ताने येतात. येथे येणाऱ्या गोव्यातील भाविकांना राहण्याची सुविधा व्हावी; यासाठी आता गोवा राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. पंढरपूरमध्ये गोवा सरकार भक्त निवास बांधणार आहे. 

Pandharpur News
Maharashtra Politics : 'मी अजित आशा-अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...' अखेर तो क्षण आलाच!

भक्त निवास बांधण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. जागा उपलब्ध झाल्यानंतर गोवा सरकार त्या ठिकाणी सर्व सोयी नियुक्त असे भक्त निवास बांधणार आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाईल; अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी आज दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सर्व सामान्य लोकांना सुख शांती समृद्धी मिळदे असे आपण विठुरायाला साकडे घातल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com