पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरती बेकायदेशीरपणे रॅली काढत शक्तीप्रदर्शन आणि कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानबद्धतेची कारवाई केलेला गुंड गजानन मारणे याची नागपूर (Nagpur) कारागृहामधून रविवारी सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये मारणे याला पुणे (Pune) ग्रामीण पोलिसांनी (police) अटक करून एमपीडीए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. २ खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर मारणे याची १६ फेब्रुवारी २०२१ दिवशी तळोजा कारागृहातून (Prison) सुटका झाली होती. (Gaja Marane released from Nagpur Jail)
हे देखील पहा-
यामुळे त्याच्या जवळच्या व्यक्तींनी मारणे कारागृहातून बाहेर येताच बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले आहेत. यानंतर मुंबई (Mumbai)- पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ आरडा- ओरडा करून दहशत निर्माण करण्यात आली आहे. आणि त्याची रॅली देखील काढण्यात आली होती. या प्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे, पिंपरी- चिंचवड आणि पुणे ग्रामीण (Rural) पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तो अज्ञात ठिकाणी गेला होता. स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एमपीडीए कायद्याखाली प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो मंजूर केला होता. मात्र, तेव्हा गजानन मारणे फरार होता.
ग्रामीण पोलिसांनी त्याला जावळी तालुक्यातील मेढा येथे ७ मार्च २०२१ या दिवशी अटक करून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पुण्यातून त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात हलविले होते. मुदत संपल्याने त्याची नागपूर कारागृहातून सुटका केल्याची माहिती ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी यावेळी दिली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.