Buldhana: अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

अल्पभूधारक शेतकरी अजीजखा गफूरखा यांनी शेतात उंदीर मारायचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या
Buldhana: अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
Buldhana: अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्यासंजय जाधव
Published On

बुलढाणा: सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर (Malkapur) पांग्रा येथे सततची नापिकी आणि त्यातच खाजगी (Private) सावकाराकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचेनात सापडलेल्या अल्पभूधारक शेतकरी (Farmers) अजीजखा गफूरखा यांनी शेतात (field) उंदीर मारायचे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या (self-slaughter) केली आहे. (Buldhana self slaughter by questioning poison of farmers)

हे देखील पहा-

सिंदखेडराजा (Sindkhedraja) तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील अल्पभूधारक 60 वर्षीय शेतकरी अजीजखा गफूरखा यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. या शेतात सोयाबीन (Soybean) पेरले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे २ एकर शेतील १ क्विंटल देखील उत्पादन झाले नाही. त्यानंतर रब्बी गहू पेरला. मात्र तोही व्यवस्थित आला नाही. त्यामुळे एक खाजगी सावकाराकडून उसनवारीने घेतलेले कर्ज कसे फेडावेत या विवंचनेत अजिजखा या शेतकऱ्याने उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले आहे.

Buldhana: अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
शिवसेना भवनात उद्या पुन्हा पत्रकार परिषद, संजय राऊत करणार मोठा धमाका?

ही बाब त्यांची मुले शेतात आल्यावर त्यांनी सांगितले, मुलांनी तात्काळ बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात (hospital) भरती केले. मात्र, प्रकृती चिंताजनक झाल्याने जालना (Jalna) येथे हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला आहे. मलकापूर पांग्रा येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com