Raj Thackeray  Saam Tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray : महापालिका निवडणुकीत "भोपळा", मनसेमध्ये मोठी उलथापालथ होणार, राज ठाकरे भाकरी फिरवणार

MNS gets zero seats in Pune municipal corporation elections : पुणे महापालिका निवडणुकीत मनसेला एकही जागा मिळाली नाही. या पराभवानंतर पक्षात मोठे संघटनात्मक बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Akshay Badve

Raj Thackeray latest news : पुणे महापालिकेत एकेकाळी २९ नगरसेवक असलेल्या मनसेला यंदाच्या निवडणुकीत मात्र एकही नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे पुण्यातील शहर कार्यकारणी मध्ये लवकरच बदल होण्याचे संकेत आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. निवडणुकीमध्ये जय पराजे होत असतात पुणे महापालिका निवडणुकीत यंदा आम्ही पहिल्यांदाच शिवसेनेसोबत युतीमध्ये लढलो. पराभव आम्ही मान्य केला असून लवकरच त्याबाबत आत्मचिंतन केलं जाईल तसेच राज साहेब आणि शर्मिला वहिनी यांच्याशी बोलल्यानंतर शहरात बदल दिसेल अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे. निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आखायला आम्ही कमी पडलो. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध धनकशक्ती होती असं असलं तरी सुद्धा येत्या काळात आदरणीय राज साहेब लवकरच पुण्यात येतील आणि बैठक घेतील अशी माहिती त्यांनी दिली. फक्त शहराध्यक्ष पदाबाबत विचारू नका कारण पक्षात येत्या काळात अनेक बदल झालेले दिसतील असं ही संभूस म्हणाले.

पुणे महापालिकेच्या 165 जागांसाठी मनसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केली होती. महापालिकेच्या ४४ जागांवर मनसे ने त्यांचे उमेदवार दिले. अनेक प्रभागात उमेदवारांनी त्यांच्या परीने होणारा प्रचार केला मात्र पक्षाला याचा कुठलाच फायदा झाला नाही. ४४ पैकी मनसेला पुण्यात खातं सुद्धा उघडता आलं नाही.

माध्यमांशी संवाद साधताना संभूस म्हणाले, "पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही पराभव मान्य केलं आहे. काही गोष्टींचे आम्हाला आत्मचिंतन करावं लागेल. वहिनीसाहेब आणि राज साहेब यांच्याशी बोलणं झालं आहे. राज साहेब स्वतः पुण्यात येतील आणि बदल केले जातील. पराभवाचे आत्मचिंतन करायचं आहे."

"भाजप ने कार्यकर्त्यांची फोडाफोडी केली, मतदारांची नावं गायब होणे, मशीनचा गोंधळ झाला आम्ही आमच्या पक्षाचं आत्मचिंतन होईल. सुतोवाच असा आहे की शहरात मोठे बदल करावे लागतील. राज साहेब आढावा घेऊन कुठली पदं बदलायची आहेत ते निर्णय घेतील," असं ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, "अनेक ठिकाणी दुबार मतदान झालं, खिरापत वाटल्यासारखे पैसे वाटले गेले. धन शक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई होती. बरेच बदल अपेक्षित आहेत ते निर्णय राज साहेब घेतील. तिकीट वाटपाच्या वेळी काहीसा गोंधळ झाला होता त्यावर सुद्धा चर्चा होईल. लवकरच साहेब पुण्यात येतील आणि सर्व विषयावर बोलतील. राज साहेब यांचं पूर्ण शेड्युल मुंबईत व्यस्त होतं राज साहेब यांची पुण्यात सभा व्हावी अशी मागणी आम्ही केली होती पण उद्धव साहेब आणि त्यांचं वेळापत्रक मॅच न झाल्यामुळे पुण्यात सभा झाली नाही."

काय असू शकतात मनसेच्या पराभवाची कारणे?

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उबाठा चे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना मनसेची युती जाहीर केली. मात्र हीच युती पुढे पुण्यात कधी जाहीर होईल याची वाट दोन्ही पक्षाचे इच्छुक उमेदवार त्याच दिवसापासून पाहत होते मात्र तिकीट वाटपाच्या शेवटच्या दिवसापर्यंत यात कुठे ही स्पष्टता दिसली नाही. शिवसेना उबाठा आणि पुणे शहर काँग्रेस ने आघाडी करत पुणे महापालिका लढवण्याचं ठरवलं, त्यात ही मनसेच्या जागा किती असा प्रश्न विचारल्यावर सेनच्या नेत्यांकडे ठोस उत्तरं नव्हती. पुणे शहरासाठी उबाठा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी मनसेला आमच्या कोट्यातून जागा दिल्या जातील असं जाहीर झाल्यानंतर मनसे ने शहरात ४४ जागांवर उमेदवारांना तिकिटं दिली.

मनसेने ४४ जागांवर निवडणूक लढवण्याच ठरवलं मात्र पक्षाकडून एक ही वरिष्ठ नेते किंबहुना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एक ही सभा घेतली नाही. इतकचं नाही तर मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह पक्षातील एक ही वरिष्ठ नेता पुणे शहरात फिरकला सुद्धा नाही. दुसऱ्या बाजूला, उमेदवारांकडून सुद्धा पुणे शहरात कुठे ही प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसलं नाही. शहराध्यक्ष साईनाथ बाबर, नेते बाबू वागसकर, माजी नगरसेवक किशोर शिंदे यासारखे मोठे नेते निवडणूक लढवत असून सुद्धा त्यांच्या प्रचाराची शहरात कुठेही चर्चा झाली नाही.

भाकरी फिरवून राज ठाकरे पुणे शहरात कोणाला संधी देणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या काही दिवसात पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. एकेकाळी मनसेचा महापालिकेत दबदबा होता तसेच मनसेनं केलेली अनेक आंदोलनं सुद्धा राज्य पातळीवर गाजली होती. भोंग्या चे आंदोलन असेल किंवा मराठी पाट्या सक्तीसाठी केलेलं निदर्शनं, मनसेकडून दिसलेली आक्रमक भूमिका उभ्या शहराने पाहिली मात्र गेल्या काही वर्षांपासून मनसेची "खळखट्याक स्टाईल" कुठेतरी मागे पडली. आक्रमक भूमिका घेणारे पक्षातील अनेक नेते शब्दशः "गार" पडले की काय अशी चर्चा पक्षातील च अनेक पदाधिकाऱ्यांनी दबक्या आवाजात केली. विधानसभा निवडणूक लढविलेल्या मनसे चे अनेक जणं यंदाच्या महापालिका निवडणुकीत उतरले होते मात्र याठिकाणी सुद्धा त्यांना अपयशाला समोरं जावं लागलं.

पक्ष संघटना, पक्षाचे मजबुतीकरण, सदस्यता नोंदणी, आंदोलनं यासारख्या गोष्टींमध्ये एकेकाळी युवकांना प्रेरित करणारा मनसेच्या इंजिनला आता नव्या इंधनाची गरज आहे त्यामुळे आता राज ठाकरे पक्षातील कोणाला संधी देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दावोसहून नंदुरबारसाठी 4 हजार कोटींची गुंतवणूक

आठ दिवसानंतर लॉजमध्ये आढळली बॉडी; गायब झालेल्या २७ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं?

Actress Harassment: आधी कंबरेला स्पर्श, मग अश्लील हावभाव केले...; कार्यक्रमातच प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक कृत्य, काय घडलं?

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

Shivaji Maharaj Indian Navy history: छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हटलं जातं?

SCROLL FOR NEXT