Kdmc News saam digital
मुंबई/पुणे

Travel Free kdmt Bus: केडीएमटीच्या बसमधून महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत; ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

Kdmc News- या निर्णयानुसार आजपासून ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिंकाना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के टक्के प्रवास सवलत देण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Free Travel For Seniors In Kdmt Bus

कल्याण वाहतुक प्रवासाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आता केडीएमसी पालिका हद्दीतील ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना केडीएमटीच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के प्रवास सवलत देण्यात आली आहे.(Latest Marathi News)

शासन निर्णयानुसार कल्याण -डोंबिवली महानगरपालिका परिवहन बसमधून पालिका हद्दीतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कल्याण- डोंबिवली प्रशासनाने(ता.१५) शुक्रवारी पालिका मुख्यालयात व्हिडिओ कॉलव्दारे आयुक्त तसेच वाहतूक परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोणत्या प्रवाशांना सवलतीचा लाभ

या निर्णयानुसार आजपासून ६० वर्षांहून अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिंकाना मोफत प्रवास आणि महिलांना ५० टक्के टक्के प्रवास सवलत देण्यात येणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. भिंवडी पालिका तसेच उल्हासनगर पालिका, अंबरनाथ आणि बदलापूर या सर्व शहरातील पालिका हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना या सवलत योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कल्याण महानगर परिवहन महामंडळ

गुरुवारी शासनाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेसह आसपासच्या महापालिकांचे कल्याण महानगर परिवहन महामंडळ स्थापन करण्यास हिरवा कंदिल दर्शवला आहे.या महामंडळाचा कारभार सुरू होताच डोंबिवली हद्दीतील प्रवासी एकाच बसमधून कल्याण उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर तसेच भिंवडी शहरापर्यंत प्रवासाचा लाभ घेऊ शकतो. किमान दीड वर्षांपासून या महामंडळाच्या स्थापनेचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

SCROLL FOR NEXT