Mumabai water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! मुंबईत २ दिवस पाणी कपात, जाणून घ्या कधी, कुठे होणार कमी दाबाने पाणीपुरवठा

Mumabai water Cut News : मुंबईच्या पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरांमध्ये दोन दिवस पाणी कपात केली जाणार आहे
 mumbai Water Supply
mumbai Water SupplySaam TV
Published On

रुपाली बडवे

Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे. प्रशासनाकडून ही पाणी कपात दिनांक २७ मार्च २०२३ रोजी रात्री १० ते दिनांक २९ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेपर्यंत १५ टक्के केली जाणार आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या (Mumbai) पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु होते. सदर काम हे मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई – २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी (Water) गळती होत असल्याचे आज निदर्शनास आले.

 mumbai Water Supply
Mumbai Goa Highway News: मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक उद्यापासून दिवसा बंद राहणार; चेक करा टाईमटेबल

पाणी गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहत आणणाऱ्या या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे.

सदर दुरुस्ती कालावधित म्हणजे आज सोमवार, दिनांक २७ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेपासून बुधवार, दिनांक २९ मार्च २०२३ रोजी रात्री १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुंबई पालिकेने पाणी कपात करण्यात निर्णय घेतल्याने नागरिकांना आवाहन केले की, संबंधित परिसरातील नागरिकांना उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

१) पूर्व उपनगरे –

टी विभागः मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग

एस विभागः भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.

एन विभागः विक्रोळी, घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग

एल विभागः कुर्ला (पूर्व) विभाग

एम/पूर्व विभागः संपूर्ण विभाग

एम/पश्चिम विभागः संपूर्ण विभाग

 mumbai Water Supply
Trupti Desai News: महिला आपल्या पुढे गेलेली बघवत नाही, तृप्ती देसाईंची इंदुरीकरांवर टीका; तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो...

२) शहर विभाग –

ए विभागः संपूर्ण विभाग

बी विभागः संपूर्ण विभाग

ई विभागः संपूर्ण विभाग

एफ/दक्षिण विभागः संपूर्ण विभाग

एफ/उत्तर विभागः संपूर्ण विभाग

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com