Trupti Desai News: महिला आपल्या पुढे गेलेली बघवत नाही, तृप्ती देसाईंची इंदुरीकरांवर टीका; तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो...

Trupti Desai On Indurikar Maharaj: राजकारणी तुमच्यावर पांघरुन का घालतात हे देखील सगळ्यांना माहिती आहे
Trupti Desai - Indurikar Maharaj
Trupti Desai - Indurikar MaharajSaam tV
Published On

Indurikar Maharaj News: कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी आपल्या कीर्तनादरम्यान दुसऱ्यांदा नाव न घेता गौतमी पाटीलवर निशाणा साधला आहे. इंदुरीकरांची ही टीका मात्र तृप्ती देसाईंना पटलेली नाही. म्हणूनच तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर निशाणा साधला आहे. महिला पुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकर गौतमी पाटीलवर टीका करत असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं.

ज्या महिलांचा तुम्ही अपमान करता, तुमच्यावर अशी नामुष्की येऊन गेलीय की व्हिडीओ देखीत तुम्हाला युट्यूबवरुन डिलिट करावे लागले होते. एखादी महिला लावणी सम्राज्ञी म्हणून पुढे आली, अन् तिला एका शोसाठी लाखो रुपये मिळत आहेत म्हणून त्यावर तुम्ही बोलता. तुम्हीही किती पैसे घेता हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो आणि राजकारणी तुमच्यावर पांघरुन का घालतात हे देखील सगळ्यांना माहिती आहे, असा गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी इंदुरीकर महाराजांवर केला.

Trupti Desai - Indurikar Maharaj
Gautami Patil Dance: तुझा छंद लागला... गौतमीचा हटके लूक अन् खिळवून ठेवेल असा डान्स पाहाच

एखादी महिला पुढे जाऊ लागली ती तिच्याबद्दल बोलायचं आणि स्वत:चं महत्त्व वाढवून घ्यायचा प्रयत्न करायचा. गौतमी पाटील लावणी करते आणि तुम्ही कीर्तन करता. त्यामुळे प्रबोधन करताना लोक जे मानधन देतील ते घ्यायचं असतं. पण तुमचे आकडे एवढे मोठे आहेत की तुम्हीही पैशांचा बाजारच करता.

गौतमीने आपली वेगळी ओखळ निर्माण केली आहे. त्यामुळे लोक तिला स्वत:हून मानधन देत असतील. मग तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? तिला प्रेम मिळतंय, पण तुम्ही बोलत आहात म्हणजे पुन्हा महिला पुढे जाते हे तुम्हाला सहन होत नाही, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली.

Trupti Desai - Indurikar Maharaj
Gautami Patil News : सबसे कातील गौतमी पाटीलवर पुन्हा एकदा बरसले इंदुरीकर महाराज; सांगितला स्वत: अनुभवलेला प्रसंग

काय म्हणाले इंदुरीकर महाराज?

कीर्तनकारांनी पाच हजार जास्त मागितले तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडला आहे. मात्र तीन गाण्यांसाठी दीड लाख रुपये देतात. तीनच गाणी पण शिट्ट्या...? गाडा आला आणि घाटात राडा झाला, असं म्हणतात. थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदुरीकर महाराजांनी उपस्थितांना यावेळी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com