Marathi Actress : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, आमिर खानच्या सिनेमात वर्णी

Marathi Actress Bollywood Debut : मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले आहे. ती मिस्टर परफेक्शनिस्ट सोबत चित्रपटात झळकणार आहे.
Marathi Actress Bollywood Debut
Marathi ActressSAAM TV
Published On
Summary

आमिर खानचा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आमिरच्या नवीन चित्रपटत मराठी टिव्ही अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.

नवीन चित्रपटाची झलक शेअर करून अभिनेत्रीने आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

अनेक मराठी कलाकारांचे स्वप्न असत की हिंदी चित्रपटात काम कराव. बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसोबत काम करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकारांचे स्वप्न पूर्ण होताना आपल पाहतो. सई ताम्हणकर, अमृता खानविलकर , नॅशनल क्रॅश गिरिजा ओक अशा अनेक अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटात काम केले आहे. अशीच एक सुवर्णसंधी आता मराठी टिव्ही विश्वात काम करणाऱ्या अभिनेत्रीला मिळाली आहे.

सध्या 'तू ही रे माझा मितवा' या मराठी मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्रीला बॉलिवूडची लॉटरी लागली आहे. अभिनेत्री बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खानसोबत झळकणार आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून मधुरा जोशी आहे. मालिकेत मधुराने ईश्वरीच्या बहिणीची म्हणजे नम्रता देसाई ही भूमिका साकारली आहे.

मधुरा जोशी ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. तिने आजवर मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. आता मधुराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात चित्रपटाची एक झलक पाहायला मिळत आहे. यात मधुरा जोशीचा खास अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडीओला तिने "माझा पहिला बॉलिवूड चित्रपट...तो शेफ आहे, तो एजंट आहे (थोडाफार), तो नायक आहे (बहुतेक!) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – तो आहे HAPPY PATEL..." असे खास कॅप्शन दिले आहे. तसेच तिने पोस्टमध्ये तिला संधी देणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत.

मधुरा जोशी काम करत असलेल्या बॉलिवूड सिनेमाचे नाव 'हॅपी पटेल खतरनाक जासूस' असे आहे. हा चित्रपट 16 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दास यांनी केले आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती आमिर खान प्रोडक्शनच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. चित्रपटात आमिर खान, मधुरा जोशीसोबत मोना सिंग, मिथिला पालकर, वीर दास हे कलाकार देखील झळकणार आहेत.

Marathi Actress Bollywood Debut
Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com