पुणे शहरात भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं आहे. येरवड्यात लाकडी साहित्याच्या गोदामाला भीषण आग लागली, तर पुण्यात वाघोलीत वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली (Pune Fire) आहे. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)
येरवड्यात (Yerwada) लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येरवड्यात बालाजीनगर येथे लाकडी साहित्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली (Pune News) आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या पाच गाड्या दाखल झालेल्या आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या आगीत गोडाऊनमधील लाकडी साहित्य संपूर्ण पेटले आहे. गोडाऊनमध्ये असणाऱ्या इतर साहित्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले (Fire Broke Out At Godown In Yerwada) नाही. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
वाघोलीतील आगीची घटना
पुण्यात वाघोलीत वाहनांचे स्पेअर पार्ट असलेल्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. वाघोलीतील गाडे वस्ती परिसरात वाहनांचे जुने स्पेअर पार्ट असलेल्या स्क्रॅप गोदामाला आग (Fire At Vehicle Spare Parts Godown Wagholi) लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आगीची घटना
सुमारे तीन तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र रात्री 10 वाजता पुन्हा धूर दिसू लागल्याने अग्निशामक दलाला पुन्हा पाचारण करण्यात आले होते.
गाडे वस्ती परिसरात एफजी चमाडिया नावाचे स्क्रॅप गोदाम आहे. काल दुपारी साडेतीनच्या सुमारास आग (Wagholi) लागली. या गोदामात वाहनांच्या जुन्या पार्टसह टायरही होते.ते जळाल्याने मोठ्या प्रमाणावर काळा धूर पसरला होता. आग मध्येच भडकत होती. गोदाम मोठे असल्याने आग लवकर आटोक्यात येत नव्हती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.