Goregaon Ram Mandir Road Area Shop's Caught Fire
Goregaon Ram Mandir Road Area Shop's Caught FireSaam Tv

Goregaon Fire: गोरेगावमध्ये अग्नितांडव! राममंदिर परिसरातील अनेक दुकानांना आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Mumbai Breaking News: मुंबईच्या गोरेगाव राम मंदिररोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथेही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.
Published on

Goregaon Fire News:

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या गोरेगाव राम मंदिररोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथेही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या गोरेगाव (Goregaon) राम मंदिर रोड परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगावमधील राम मंदिर रोड परिसरातील भडेकर कंपाऊंड 90 फूट रोड येथेही आग लागली असून आगीत अनेक दुकाने जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे.

आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या असून आधीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दुकानांना लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहे.

Goregaon Ram Mandir Road Area Shop's Caught Fire
Loksabha Election 2024: जळगावमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार? रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांचे सूचक विधान

दरम्यान, दुकानातील पहिल्या मजल्यावर लाकडी आणि फर्निचरला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती असून महापालिका आणि आदानी इलेक्ट्रिसिटी चे कर्मचारी तसेच पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Goregaon Ram Mandir Road Area Shop's Caught Fire
Maharashtra Election : मुंबईत महायुतीत ३ जागांचा पेच कायम? २ जागांच्या अदलाबदलीची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com