Loksabha Election 2024: जळगावमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार? रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांचे सूचक विधान

Raver Loksabha Constituency News: रावेरमधून रक्षा खडसे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असतानाच आता महाविकास आघाडीकडून त्यांच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Raver Loksabha Constituency News:
Raver Loksabha Constituency News:Saamtv
Published On

Loksabha Election 2024:

भारतीय जनता पक्षाकडून काल लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या रावेर लोकसभा मतदार संघातून सध्या शरद पवार गटात असलेले एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रावेरमधून रक्षा खडसे पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरणार असतानाच आता महाविकास आघाडीकडून त्यांच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत सूचक विधान केले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

"रोहिणी खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात, असे महत्वाचे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. रोहिणी खडसे यांच्या नावाला स्थानिक नेत्यांचा पाठिंबा आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांची तशी मागणी आहे, असे म्हणत येत्या दोन तीन दिवसात याबाबत निर्णय होईल," असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्या प्रवेशाबाबतही महत्वाचे विधान केले आहे. "निलेश लंके शरद पवार यांना भेटण्यासाठी आज येत आहेत. निलेश लंके लोकांमधले नेते आहेत ते पक्षात आले तर स्वागतच आहे, असे म्हणत आमचे जागा वाटप अजून झाले नाही, पण निलेश लंके एक चांगला चेहरा आहे," असे सूचक वक्तव्यही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raver Loksabha Constituency News:
Raosaheb Danve News: ही विचारांची लढाई; समोर कोणीही आलं तरी पराभव करु... रावसाहेब दानवेंना विश्वास

दरम्यान, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये दोन मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. एकीकडे पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा आजचं पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरेही (Vasant More) शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळेच या दोघांच्या माध्यमातून शरद पवार गटात मोठे पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Raver Loksabha Constituency News:
Buldhana Accident : भरधाव वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; नातेवाईकांसह गावकऱ्यांचा महामार्गावर ठिय्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com