Chandrapur Fire News : A to Z बाजाराला भीषण आग, गॅस सिलिंडरचा ब्लास्ट; दाेन घरे जळून खाक

Chandrapur Latest Marathi News : दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे हे दुकान असल्याने यात बहुतांश साहित्य प्लास्टिक स्वरूपातील हाेते. त्यामुळे आगीने लगेच भडका घेतला.
fire broke in plastic things shop two house burnt near chandrapur
fire broke in plastic things shop two house burnt near chandrapur saam tv

Chandrapur :

चंद्रपूर शहरातील तुकुम भागात आज (शुक्रवार) सकाळी A to Z बाजाराला भीषण आग लागली. या घटनेत A to Z बाजारच्या नजीकची दोन घरे जळून खाक झाली. या घटनेत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट (lpg domestic gas cylinder blast) झाला. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने (chandrapur fire brigade) अथक परिश्रम घेत आग आटाेक्यात आणली. या आगीमुळे सुमारे तासभर तुकुम भागात नागरिकांची माेठी गर्दी जमली हाेती. (Maharashtra News

चंद्रपुरातील तुकुम भागात ए डू झेड बाजार नावाचे दुकान आहे. त्यास आज सकाळी अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करीत संपूर्ण दुकानाला कवेत घेतले. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे हे दुकान असल्याने यात बहुतांश साहित्य प्लास्टिक स्वरूपातील हाेते.

fire broke in plastic things shop two house burnt near chandrapur
Nandurbar Anganwadi Karmchari Morcha : अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी उद्धटवर्तन? हजाराे सेविकांचा नंदुरबार झेडपीवर थाळी नाद माेर्चा; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

त्यामुळे आगीने लगेच भडका घेतला. दाट लोकवस्तीमध्ये दुकान असल्याने लगतची दोन घरेही यात जाळली. यावेळी दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले. सुमारे तासाभरानंतर आग आटोक्यात आली. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दर्यापूर शहरात तीन दुकानांना आग

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरात गुरूवारी रात्रीच्या सुमारास तीन दुकानांना भीषण आग लागली. या घटनेत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. दर्यापूर शहरातील गांधी चौक येथील टायरचे पंक्चर काढणा-या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

Edited By : Siddharth Latkar

fire broke in plastic things shop two house burnt near chandrapur
Kolhapur Crime News : काेल्हापूरात पोलिसाची हाॅटेल मालकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद (video)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com