ज्ञानेश्वर हिंगोलीकर -
पुणे: मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज देतो असे सांगुन नागरिकांना फसवणाऱ्या बंटी-बबली यांना पुणे पोलिसांकडून (Pune Police) अटक करण्यात आली आहे. या दोघांनी तब्बल १०० ते १५० लोकांना फसवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हेमराज बावसार आणि दिपाली पौनिकर अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे दोघे ही युट्यूबवरचे कलाकार (YouTube Artists) आहेत.
सध्याच्या डिजिटल युगात अनेकांना झटपट कर्ज देण्याची प्रलोभन देऊन त्यांची फसवणूक केल्याची अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. शिवाय याच तंत्रज्ञानाचा गैर फायदा घेत अनेक खोट्या वेबसाईट देखील तयार केल्या जातात.
पाह व्हिडीओ -
त्यामुळे अनेक लोकांची ऑनलाईन (Online) पद्धतीने फसवणूक केली जात असल्याच्या घटना घटत असतानाच आता मायक्रो फायनान्सद्वारे कर्ज देतो असे सांगुन नागरिकांना फसवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानधन मायक्रो फायनान्स नावाची खोटी संस्था या दोघा बंटी बबलींनी सुरू केली होती. मुकुंदनगर येथे कार्यालय काढून तिथे येणाऱ्या लोकांना कर्जाची हमी हे दोघे द्यायचे.
कुठले ही कर्ज १५ दिवसात उपलब्ध होईल अशी खोटी बतावणी करून लोकांची आगाऊ घेतलेली रक्कम परत न देता १२ लाख रुपयांपेक्षा फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांकडे गुन्हा दाखल होता. पोलिसांनी पथक तयार करून या दोघांना गुजरात मधून ताब्यात घेतले आणि त्यांना अटक केली. कोर्टाने या दोघांना २५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांनी एवढी मोठी रक्कम पुढे कुठे वापरली तसेच यांची अजून कुठली टोळी आहे का याचा तपास आता पुणे पोलिस घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.