महिला पत्रकाराचा हिजाब घालण्यास नकार; इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी मुलाखत देणं टाळलं

हिजाबच्या मुद्यावरुन जगभरात गोंधळ सुरु असतानाच इराणच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केलेल्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Ebrahim Raisi
Ebrahim RaisiSaam TV
Published On

Iran Hijab Issue: हिजाबच्या मुद्यावरुन जगभरात गोंधळ सुरु असतानाच इराणच्या राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (Ibrahim Raisi) यांनी केलेल्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अमेरिकेतील एका महिला पत्रकाराने हिजाब न घातल्यामुळे तिला मुलाखत देण्यास रायसी यांनी नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्य पूर्व देशांमध्ये हिजाबचा मुद्दा प्रचंड चर्चेत असतानाच हे प्रकरण समोर आलं आहे.नुकतेच हिजाबचे नियम मोडल्याचा आरोप करत एका महिलेचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर इराणमधील महिला निदर्शन करत आहेत, शिवाय या प्रकणाचा जगभरातून निषेध केला जात आहे.

पाहा व्हिडीओ -

अशातच इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी महिला सीएएन वृत्तसंस्थेच्या महिला पत्रकार क्रिस्टीन एमनपोर यांनी हिजाब घातला नाही म्हणून मुलाखत देण्यास नकार दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इब्राहिम रईसी यांची मुलाखत एका अमेरिकन महिला न्यूज अँकर घेणार होती.

मात्र, या मुलाखती आधी तिला हिजाब (Hijab) घालण्यास सांगण्यात आलं. यावेळी या महिला पत्रकाराने त्याला विरोध केला. त्यामुळे नियोजित मुलाखतीसाठी ती आली तरी केवळ हिजाब न घातल्यामुळे तिला मुलाखत देणं रईसी यांनी टाळलं.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या या कृतीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. शिवाय या प्रकरणानंतर महिला पत्रकाराने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, मला हेडस्कार्फ घालण्यास सांगितले होते, परंतु मी तसे करण्यास नकार दिला. यानंतर ही मुलाखत अचानक रद्द करण्यात आली. ४० मिनिटे इराणच्या राष्ट्राध्यक्षांची वाट पाहत होते. मात्र, ते आले नाहीत.

Ebrahim Raisi
हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश; 24 विद्यार्थिनींबाबत महाविद्यालयाचा मोठा निर्णय!

शिवाय मोहरमचा पवित्र महिना असल्याने डोक्यावर स्कार्फ घालावा लागेल, असे महिला पत्रकाराला सांगण्यात आलं होतं. मात्र, आम्ही न्यूयॉर्कमध्ये आहोत आणि इथे डोक्यावर स्कार्फबाबत असा कोणताही कायदा नाही. इराणच्या बाहेर मुलाखती घेत असताना यापूर्वी कोणत्याही इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी अशी मागणी केलेली नाही.

इराणमध्ये हिजाबवादामुळे हिंसाचार

दरम्यान, इराणमध्ये पोलिसांनी गेल्या आठवड्यात २२ वर्षीय महसा अमिनी हिला हिजाबने केस नीट झाकले नसल्याचे सांगून ताब्यात घेतले. या तरुणीचा पोलिस ठाण्यातच तीन दिवसांमध्ये मृत्यू झाला होता. तरुणीच्या मृत्यूनंतर इराणमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर आणि त्यानंतर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत आत्तपर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com