हिजाब परिधान करून वर्गात प्रवेश; 24 विद्यार्थिनींबाबत महाविद्यालयाचा मोठा निर्णय!

कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २४ विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल एक मोठा निर्णय दिला आहे.
Karnataka Hijab Row
Karnataka Hijab RowSaam TV

कर्नाटक: कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २४ विद्यार्थिनींना हिजाब परिधान केल्याबद्दल ७ दिवसांच्या वर्गात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुत्तूर तालुक्यातील उप्पिनगडी पदवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हिजाब न काढता वर्गात जाण्यास नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा कर्नाटक सरकारने (Karnataka Government) शाळा आणि महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्यास परवानगी न देता गणवेशच अनिवार्य केला आहे. जरी बहुतेक विद्यार्थी वर्गांना गणवेशात उपस्थित राहणे पसंत करत आहेत. परंतु तरीही एक वर्ग हा हिजाब परिधान करून वर्गात जाण्याची परवानगी देण्याचा आग्रह काय ठेवून आहेत.

Karnataka Hijab Row
बीड: अवैध गर्भपात प्रकरणात गर्भलिंग निदान केलेल्या ठिकाणाहून धक्कादायक माहिती उघड

'तुम्हाला हिजाब घालून वर्गात जायचे असेल तर तुम्ही ट्रान्सफर सर्टिफिकेट घेऊ शकता'

अल्पसंख्याक समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी हिजाबला परवानगी असलेल्या इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडून हस्तांतरण प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत. कॉलेज व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना असेही सांगितले आहे की ज्यांना हिजाब घालून वर्गात जायचे आहे ते ट्रान्सफर सर्टिफिकेट घेऊ शकतात.

हे देखील पाहा-

'हिजाब हा इस्लामचा अनिवार्य धार्मिक भाग नाही'

उडुपी प्री-युनिव्हर्सिटी गर्ल्स कॉलेजच्या सहा विद्यार्थिनींचा निषेध म्हणून सुरू झालेले हिजाबचा वाद गेल्या वर्षभरापासून कर्नाटकात सुरु आहे. हिजाब हा इस्लामचा अनिवार्य धार्मिक भाग नसल्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने (High Court) यावर्षी मार्चमध्ये दिला होता, असे असतानाही या मुलींना वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याचा आग्रह आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com