Jalgaon Crime
Jalgaon CrimeSaam tv

बीड: अवैध गर्भपात प्रकरणात गर्भलिंग निदान केलेल्या ठिकाणाहून धक्कादायक माहिती उघड

ताब्यात घेण्यात आलेला संशयित महिलेकडे गडगंज संपत्ती
Published on

विनोद जिरे

बीड: अवैध गर्भपात प्रकरणात मयत शितल गाडेच्या नातेवाईकांना अटक केल्यानंतर धक्कादायक सत्य बाहेर येत आहे. गेवराई शहरात गर्भलिंग निदान केलेल्या ठिकाणी, आरोपी पोलिसांना घेवून गेले आहेत.

त्या ठिकाणी झाडाझडती सुरू केली आहे. विशेष म्हणजे गर्भलिंग प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या या महिलेकडे मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळून आली असून संशयित महिलेच्या आलिशान बंगल्यातचं गर्भलिंग निदान असल्याचं मयत महिलेच्या आरोपी सासऱ्यांने सांगितल आहे.

Jalgaon Crime
बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

यामुळे एकचं खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गर्भलिंग निदान करून गर्भपात करताना गर्भ पिशवी कट झाली, यामुळं अती रक्तस्रावामुळे शितल गाडे चा मृत्यू झाला होता.. या प्रकरणांमध्ये मोठ रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता पोलिस प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात कोण कोण आहे याचं याचे माझ्या मूळ शोधण्याचा काम आता पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com