forest department traps third leopard in loni near ahmednagar Saam tv
मुंबई/पुणे

Leopard Trapped In Loni : नरभक्षक बिबट्यासाठी 16 पिंजरे, ड्राेन कॅमे-याची नजर; लाेणीत तीन बिबटे जेरबंद

Ahmednagar Leopard : नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामस्थांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Ahmednagar News :

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (loni) परीसरात बिबट्यांनी (leopard) धुमाकूळ घातला हाेता. बिबट्याच्या हल्ल्यात दोन लहान मुलांना आपला जिव गमवावा लागला. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले हाेते. अखेर पंधरा दिवसांपासुन बिबट्याला पकडण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. लोणी गावच्या परिसरात आत्तापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. (Maharashtra News)

राहाता तालुक्यातील लोणी गावात दहा दिवसापूर्वी एका नऊ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात त्याला आपला जिव गमवावा लागला. ही घटना ताजी असतानाच लोणी गावाशेजारी असणा-या सादतपूर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय मुलाचा बळी गेला.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने जवळपास 16 पिंजरे लावले आहेत. ड्रोनच्या साहाय्यानेही बिबट्यांचा शोध घेतला गेला. या परिसरात अनेक बिबटे असून नरभक्षक बिबट्याला शोधण्याचे काम तसं अवघड समजले जाते. तरी देखील वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले. त्यातूनच आत्तापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामस्थांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT