Solapur DJ Ban : सोलापूरकरांच्या लढ्याला यश; अखेर जिल्ह्यात डीजे बंदी, ६ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणीचे निर्देश

Solapur News : डीजेमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास तसेच त्यातून होणारे अपघात आणि जीवितहानी याबाबत अनेकांनी निवेदन देत बंदीची मागणी केली होती. इतकेच नाही तर नागरिकांनी यासाठी सह्यांची मोहीम राबविली
Solapur DJ Ban
Solapur DJ BanSaam tv
Published On

सोलापूर : गणेशोत्सवात डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असतो. याचा त्रास होत असल्याने डीजे बंदी करण्याची मागणी सोलापूरमध्ये करण्यात येत होते. यासाठी नागरिकांनी सह्यांची मोहीम, डॉक्टरांची रॅली, मानवी साखळी या पध्दतीने गेल्या पंधरा दिवसात सोलापूरकरांनी डीजेमुक्तीसाठी केलेल्या आंदोलनाला आज यश आले आहे. कर्णकर्कश डीजे विरोधात उमटणाऱ्या तीव्र प्रतिक्रियांमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीपर्यंत सोलापूर जिल्ह्यात डीजे आणि लेझर लाईट शोवर बंदी घालण्यात आली आहे. 

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. मुळात डीजेमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास तसेच त्यातून होणारे अपघात आणि जीवितहानी याबाबत अनेकांनी निवेदन देत बंदीची मागणी केली होती. इतकेच नाही तर नागरिकांनी यासाठी सह्यांची मोहीम राबविली. तसेच मानवी साखळी व डॉक्टरांनी देखील रॅली काढत डीजे वाजविण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. 

Solapur DJ Ban
Ulhasnagar Crime : जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न; उल्हासनगरात गोळीबार करत कोयत्याने वार, तिघे अटकेत

अखेर बंदीचे काढले आदेश 

नागरिकांकडून देण्यात आलेल्या निवेदनांचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव संपेपर्यंत म्हणजे ६ सप्टेंबरपर्यंत डीजे वाजविण्यावर आणि लेजर लाईटचा वापर करण्यात बंदी घालण्यात आली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी काल जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकाऱ्यांची व्हिसीद्वारे बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या.

Solapur DJ Ban
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत महिनाभरात तीन वेळा अतिवृष्टी; मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करणार 

संपूर्ण जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले असले तरी सोलापूर शहराकरिता पोलिस आयुक्त स्वतंत्र आदेश जारी करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिसीद्वारे सर्व प्रांताधिकाऱ्याना मार्गदर्शन केले. आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com