Sakinaka Fire News Saamtv
मुंबई/पुणे

Sakinaka Fire News: मोठी बातमी! साकीनाका परिसरात अग्नितांडव! भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News: अंधेरी पूर्व येथील साकीनाका (Sakinaka) मेट्रो स्टेशनजवळील इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरच्या दुकानाला आग लागली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. राकेश गुप्ता (वय 22 वर्ष )आणि गणेश देवासी अशी मृतांची नावं आहेत. आग लागली तेव्हा दुकानात अकरा कामगार झोपले होते.

त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवले असून अजूनही कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, अंधेरीतील (Andheri) साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानाला सोमवारी सकाळी आग लागली. आगीने काही वेळातच संपूर्ण दुकानाला वेढले. ज्यावेळी दुकानाला आग लागली त्यावेळी आतमध्ये लोकही उपस्थित होते, त्यात तीन जण अडकले होते. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली. यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंगचे काम सध्या सुरु आहे.

दरम्यान, या आगीत (Fire News) दुकानाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. मुंबईतील मोठं हार्डवेअर दुकान म्हणून या दुकानाची ओळख होती. दोन मचान असलेल्या दुकानात इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे. या आगीमुळे संपूर्ण साकीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोळ पसरले होते. आग कशामुळे लागली, याबाबत अधिक तपास स्थानिक साकीनाका पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान करत आहेत. (Mumbai News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT