- सिद्धेश म्हात्रे
Chhatrapati Sambhajiraje Sabha In Navi Mumbai: राज्यात मुख्यमंत्री (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री (devendra fadnavis) हे दाेघेच सरकारमध्ये (maharashtra government) काम करताना दिसत आहे. अन्य मंत्री केवळ नावालाच आहेत. एक काम मंत्री महिना न महिना करीत नसल्याचे दिसून येत आहे अशा मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati Latest News) यांनी नमूद केले.
संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची (swarajya sanghatana) पहिली जाहीर सभा रविवारी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे झाली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या जाहीर सभेस माेठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित हाेता. या सभेदरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी सन 2024च्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून समोर आला आहे.
यावेळी माध्यमांशी बाेलताना संभाजीराजेंनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीच काम करताना दिसत आहेत. सत्तार शेतक-यांविषयी काय बाेलताहेत हे सर्वांना माहित आहे.
आराेग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात किती मगरुरी आहे हे दिसून येत आहे. एक महिना झाला तरी आराेग्य विभाग काम करत नाही. धाराशिवमधील प्राथमिक आरोग्य केंद्राची मी स्वत: पाहणी केली हाेती. परंतु परिस्थिती बदलली नाही. अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्या असं काम असल्यास राग येणारच ना असेही संभाजीराजेंनी नमूद केले.
संभाजीराजे म्हणाले परवा माहीममध्ये एक वास्तू तोडून टाकली त्याच कौतुक आहे. अफझल खानची कबर काढली याचे देखील कौतुक आहे. ज्या किल्ल्यांनी सरक्षण दिलं, वाचवलं तो विशाल गड त्याची दुरावस्था झाली आहे. तात्काळ तेथील अतिक्रमण काढा असेही राजेंनी नमूद केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.