jagdish kudekar  saam tv
मुंबई/पुणे

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Badlapur Firing : बदलापुरात आमदार कथोरे यांच्या घरासमोर गोळीबार झाला असून अल्ताफ शेख जखमी झाला. त्याने शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख जगदीश कुडेकर यांचे नाव घेतले होते. या प्रकरणी जगदीश कुडेकर यांनी मोठा खुलासा केला आहे.

Alisha Khedekar

काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये आमदार किसान कथोरे यांच्या घराबाहेर बोराडपाडा रस्त्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारात अल्ताफ शेख नावाचा तरुण गंभीर जखमी झाला होता. जखमी झालेल्या अल्ताफ शेख याने जगदीश कुडेकर यांचे नाव घेतले आहे. जगदीश कुडेकर हे शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर उपशहर प्रमुख असून या गोळीबार प्रकरणात त्यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

दरम्यान बदलापुरात अल्ताफ शेखवर झालेल्या गोळीबाराशी माझा काडीमात्र संबंध नसून मी पोलिसांच्या चौकशीलाही सामोरं जायला तयार आहे असे वक्तव्य जगदीश कुडेकर यांनी केले आहे.

गुरुवारी बदलापूर येथे आमदार किसान कथोरे यांच्या घराबाहेर बोराडपाडा रस्त्यावर अल्ताफ शेख या तरुणावर पाच ते सहा जणांच्या समूहाने गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या अल्ताफ शेख याने दिलेल्या तक्रारीनंतर विवेक नायडू, उदय झुठे, शेखर गडदे, सोहम मेस्त्री आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अल्ताफ याने या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार शिवसेना शिंदे गटाचे बदलापूर उपशहर प्रमुख जगदीश कुडेकर असल्याचे सांगितले आहे.

याप्रकरणी किसान कथोरे यांनी स्पष्टीकरण देत मीडियासमोर म्हटले आहे की, अल्ताफच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. हा गोळीबार झाला त्यावेळी मी माझ्या पत्नीसह पोलीस ठाण्यातच उपस्थित होतो. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज काढल्यास हे स्पष्ट होऊ शकेल. या गोळीबाराशी आपला काडीमात्र संबंध नसून पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे, असं म्हणत हा गोळीबार आपपसातल्या भांडणातून घडल्याचा दावा जगदीश कुडेकर यांनी केला आहे.

दरम्यान आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. परंतु या गोळीबाराचा सूत्रधार कोण हे अनुत्तरीतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

Raj Thackeray: किल्ल्यांवरील नमो केंद्र फोडून काढू; राज ठाकरेंचा सरकारला गंभीर इशारा

Maharashtra Live News Update: रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे?

Raj Thackeray: सुट्टी दिली नाही तर बॉसच्या कानाखाली मारा; राज ठाकरे असं का म्हणाले? VIDEO

Ind vs Aus Semi Final: ऑस्ट्रेलियाचा तडाखा, ३३९ धावांचं टार्गेट; भारत फायनल गाठणार का?

SCROLL FOR NEXT