Shruti Vilas Kadam
झुमका हे नेहमीच लग्नासाठी सर्वोत्तम पर्याय मानले जातात. सोनं, कुंदन किंवा पोलकी काम असलेले झुमके साडी किंवा लहंग्यासोबत अप्रतिम दिसतात.
राजस्थानी स्टाईलचे कुंदन ईयररिंग्स लुकला राजेशाही टच देतात. हे भारी मेकअप आणि पारंपरिक पेहरावाशी सुंदर जुळतात.
चांदबाली ही सदाबहार डिझाईन आहे. गोलाकार आणि स्टोनवर्क असलेले हे ईयररिंग्स नवरदेवीसारखा लुक देतात.
रंगीत दगडांनी सजवलेले ईयररिंग्स कोणत्याही साध्या आउटफिटला आकर्षक बनवतात. खास करून हलक्या साड्यांसोबत हे लुक उंचावतात.
ज्यांना बोहो किंवा फ्यूजन लुक आवडतो, त्यांच्यासाठी ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर ईयररिंग्स उत्तम पर्याय आहेत. इंडो-वेस्टर्न कपड्यांवर हे उठून दिसतात.
मोत्यांचे ईयररिंग्स नेहमीच एलिगंट वाटतात. वधू किंवा ब्राइड्समेड दोघींनाही हे लुकला सौम्य आणि क्लासिक टच देतात.
जर तुम्हाला मॉर्डन आणि ग्लॅमरस स्टाईल हवी असेल, तर लाँग हँगिंग ईयररिंग्स सर्वोत्तम ठरतात. हे पार्टी किंवा रिसेप्शन लुकसाठी परिपूर्ण आहेत.