Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Badlapur Firing news : बदलापुरात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार झाला आहे.
badlapur News
badlapur Saam tv
Published On

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : पुण्यात राजरोसपणे गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. पुण्यातील गोळीबाराच्या घटनेचं लोण आता बदलापुरताही पसरलं आहे. बदलापुरात भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वी रेल्वे स्टेशनवर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता थेट भाजप आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरच गोळीबाराची घटना घडली आहे. दोन गटातील आपसातील वादातून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

badlapur News
Badlapur News :...तर अधिकाऱ्यांना घरी पाठवणार; बदलापुरात वीजपुरवठा आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे गट आक्रमक

बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडली. दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

badlapur News
Ahilyanagar News : दारू पितो, महिला नाचवतो, दहशत करतो; तृप्ती देसाईंचे भाजप नेत्यांवर गंभीर आरोप, थेट पुरावाच दिला

अल्ताफ शेख याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बदलापूर गावात आमदारांचा निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरूनच बोराटपाडा मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे.

अल्पवयीन मुलाकडून दहिसरमध्ये गोळीबार

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दहिसर परिसरात १२ वर्षांच्या मुलाने चुकून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. मुलाने केलेल्या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली. १२ वर्षाच्या मुलाला ही बंदूक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडल्याची माहिती मिळत आहे. त्याने खेळण्यातील बंदूक त्याने हवेत गोळीबार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com