Maharashtra Live News Update: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र पाऊस, हवामान अपडेट्स, राज्यातील राजकीय घडामोडी, राज ठाकरे यांची सभा, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

Jalgaon: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली

सुदैवाने मोठा अनर्थ टळला, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.

सुरू असलेल्या पावसामुळे कन्नड घाटात मोठी दरड कोसळली.

यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दरड बाजूला सरकवून वाहतूक सुरळीत केली

Pune: पुण्यातील राजाराम पुल ते नांदेडसिटीपर्यंत नदी काठ होणार सुशोभित

पुणे -

पुण्यातील राजाराम पुल ते नांदेडसिटीपर्यंत नदी काठ होणार सुशोभित

पुण्यातील एकतानगर परिसरातील नाल्याभोवती सीमाभिंत उभारली जाणार

प्रकल्पाचा खर्च ३०० कोटीवरून ४५० पर्यंत वाढणार

खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून एकतानगर परिसराला दिलासा मिळावा, यासाठी पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प

या प्रकल्पाची निविदा पुढील आठवड्यात निघणार

नदीच्या प्रवाहासाठी भिंती ९० मीटरपर्यंत रूंद केल्या जाणार

पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ८०० मीटर लांबीची वाहिनी बसविण्यात येणार तसेच पाण्याची पातळी वाढल्यास जॅकवेलद्वारे पाणी बाहेर काढले जाणार

Pune: पुणे महापालिका ऍक्शन मोडमध्ये, अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई

पुणे -

पुणे महापालिका ऍक्शन मोडमध्ये, अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई

पुण्यातील चंदननगर परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई

अतिक्रमण केलेल्या आस्थापनांवर महापालिकेचा बुलडोझर

१७ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भाग केला मोकळा

Nagpur: नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर आज तोडगा निघणार, बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर आजच तोडगा निघणार

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज होणार बैठक

बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी तोडगा निघणार

बच्चू कडू यांच्या अनेक मागण्या रास्त आहेत

बच्चू कडू यांच्यासोबत आज चर्चा होईल आणि आजच बैठकीतून सगळा तोडगा निघेल

मनोज जरांगे यांच्या देखील शेतकऱ्यांना पाठिंबा आहे

आज मुंबईत होणाऱ्या बैठकीतून मार्ग निघेल

Jalna: जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस, पिकांचे अतोनात नुकसान 

जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस

सात मंडळात अतिवृष्टी

खरीपातील पिकांचं अतोनात नुकसान

पावसाने मक्का, कपाशीसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

बळीराजा चिंतेत आला आहे

Nashik: नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत, दुकानदारावर प्राणघातक हल्ला

नाशिक -

- नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत

- कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता आणि दगडाने हल्ला

- कुणीही जखमी नाही दुकानाचे नुकसान

- हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

- नाशिक पोलिसांकडून तपास सुरू

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटिंग

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटिंग

परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतक-याचं मोठं नुकसान

कापलेली भातशेती पुर्णपणे पाण्याखाली ,भातशेती कुजण्याच्या स्थितीत

भातशेतीवर अवलंबुन असणारा कोकणातील शेतकरी चिंताग्रस्त

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या यलो अलर्ट

आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

कोकणातील शेतक-याची प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा

Pune: निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता

पुणे -

निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता

पुणे पोलिसांसह आता ईडी निलेश घायवळ प्रकरणी तपास करण्याची शक्यता

पुणे पोलिस लवकरच अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) तपासासाठी पत्र पाठवणार

Navi Mumbai: नवी मुंबईत होणार माथाडी कामगारांचा मेळावा

नवी मुंबई -

नवी मुंबईत होणार माथाडी कामगारांचा मेळावा

नवी मुंबई शहरामध्ये माथाडी कामगारांचा मेळावा व पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईकरांच्या रहिवाशांचा संवादाचा आयोजन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने करण्यात आला आहे

आगामी काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत

Nagpur: नागपूरमध्ये पावसामुळे शेतकरी आंदोलनामध्ये अडचण

नागपूर -

पावसामुळे शेतकरी आंदोलनामध्ये अडचण

रात्रभरापासून पाऊस सुरू असल्याने आज ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा पावसाची शक्यता

पावसामुळे आंदोलकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे

तसेच आंदोलन स्थळावरील मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यानं अडचण निर्माण झाली आहे..

Pune: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

पुणे -

पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

धर्मदाय आयुक्त यांच्या समोर आज सुनावणी

जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होण्याबाबत बिल्डर आणि ट्रस्टी यांची सहमती

आजच्या सुनावणीकडे जैन समाजातील सर्व बांधवांचे लक्ष

व्यवहार पूर्णपणे रद्द व्हावा ही जैन समाजातील लोकांची मागणी

Pune: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बिबट्याचा हल्ला, 3 शेळ्या ठार

पुणे -

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बिबट्याचा हल्ला

तीन शेळ्या ठार, नागरिकांत दहशत

भोर तालुक्यातील चिखलावडे खोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यांचा सिलसिला सुरूच आहे. शेतकरी संदीप पवार यांच्या तीन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला

शेळ्या शेतात चरत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला

गेल्या दोन-तीन महिन्यांत अशाच प्रकारे अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

Pandharpur: कार्तिक यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल- रूक्मिणी मंदिरावर दिव्यांची विद्युत रोषणाई

पंढरपूर -

विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर दिव्यांची विद्युत रोषणाई

कार्तिक यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

दिव्यांच्या विद्युत प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघाला आहे.

Dharashiv: धाराशिवमधील रस्त्यांची काम तातडीने सुरू करण्याची शहरातील महिलांची मागणी

धाराशिव -

धाराशिवमधील रस्त्यांची काम तातडीने सुरू करण्याची शहरातील महिलांची मागणी

भाजपा पदाधिकाऱ्यांसह महिलांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

रस्ते विकास कामाला देण्यात आलेली स्थगिती उठवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा

स्थगिती उठवलेल्या कामांना पुन्हा स्थगिती दिल्याने महीला आक्रमक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com