Deenanath Mangeshkar Hospital Tanisha Bhise death case Saam Tv News
मुंबई/पुणे

Tanisha Bhise Death Case : तनिषा भिसे मृत्यू प्रकरण : डॉ. सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढल्या, पोलिसांनी उचललं मोठं पाऊल

Tanisha Bhise Death Case update : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे.

Vishal Gangurde

दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अलंकार पोलिसांनीच घैसास यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांत गुन्हा नोंदवल्याने घैसास यांच्या अडचणीत भर पडली आहे.

दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिला मृत्यू प्रकरणात डॉ. सुश्रुत घैसास यांच्या विरोधात दिवसेंदिवस अडचणीत भर पडत आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात अंलकार पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर कलम १०६(१) नुसार अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाचा दुसरी अहवाल समोर आला आहे.

ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉ. सुश्रुत घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ससुन समितीचा दुसरा अहवाल अखेर समोर आला आहे. त्यामुळे घैसास यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. दुसऱ्या अहवालानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर काय कारवाई होते, हे पाहावे लागेल.

पोलीस उपायुक्त काय म्हणाले?

पोलिस उपायुक्त संभाजी कदम म्हणाले, 'ससून रुग्णालयाकडून पुन्हा अहवाल मागितला आहे. डॉ. घैसास यांनी निष्काळजीपण आणि हलगर्जीपणा दाखवला. वेळ घालवला. त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या अहवालानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पूर्ण चौकशी करून अहवाल दिला होता. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार होईल. शासन जीआर नुसार कारवाई करू. डॉ. घैसास यांची काय भूमिका आहे, त्यानुसार कारवाई होईल. त्यांचा जबाब घेतला जाईल. त्याची माहिती घेतली जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT