Deenanath Mangeshkar Hospital: डॉ. सुश्रुत घैसास यांच्या जीवाला धोका? पोलीस सुरक्षेची मागणी

Deenanath Mangeshkar Hospital Dr Sushrut Ghaisas : तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर हॉस्पिटल प्रशासनाची बदनामी झालीय. तसेच रुग्णांची होणारी गैरसोय पाहता सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलाय.
Deenanath Mangeshkar Hospital Dr Sushrut Ghaisas
Deenanath Mangeshkar Hospital Dr Sushrut Ghaisas
Published On

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केलीय. आपल्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी सुरक्षा द्यावी अशी मागणी डॉक्टर घैसास यांनी केलीय. पुणे पोलिसांच्या पोलीस मुख्यालयातून एक पोलीस कर्मचारी डॉ. घैसास यांच्या सुरक्षेसाठी देण्यात येणार आहे .

डॉ. सुश्रुत घैसास हे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील माजी स्त्रीरोगतज्ञ आहेत. तनिषा भिसे यांच्यावर उपचार करण्यासाठी घैसास यांनी भिसे कुटुंबियांकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती असा आरोप आहे. मात्र घैसास यांना पोलिसांकडे कुठली ही हजेरी लावण्यास सांगितलेली नाही. तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर घैसास यांनी राजीनामा दिलाय.

Deenanath Mangeshkar Hospital Dr Sushrut Ghaisas
Auto Rickshaw Uniform: पुण्यातील रिक्षा चालकांचा युनिफॉर्म ठरला! गणवेश नसेल तर थेट कारवाई

तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशामुळे गरोदर महिलेला वेळेवर उपचार देण्यात आले नाहीत. रुग्णालयच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा झाल्याचा आरोप केला जात आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. ही रक्कम न दिल्याने उपचारांना उशीर झाला त्यात तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णालयाच्या समितीकडून चौकशी केली जात आहे.

Deenanath Mangeshkar Hospital Dr Sushrut Ghaisas
PMPML Bus : रातराणीतून पीएमपीला एक कोटी रुपयांचे उत्पन्न; सहा मार्गांवर पीएमपीएलची बससेवा

दरम्यान, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये १० लाख रुपये अनामत रक्कम भरता न आल्याने भिसे कुटुंबियांना दुसऱ्या रुग्णालयात जावं लागलं. या सगळ्या गोष्टी घडताना तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचा मृ्त्यू झाला. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीका झाली.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचा अहवाल सादर झालाय. यात रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाल्याचं सांगण्यात आलंय. तनिषा मृत्यू प्रकरणी रुग्णालय दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर डॉ. घैसास यांनी राजीनामा दिलाय. आता त्यांनी पुणे पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com