Sujat Ambedkar : 'सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात शेवटचा शांतता मार्च, त्यानंतर...; सुजात आंबेडकरांनी सरकारला काय इशारा दिला?

Sujat Ambedkar News : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात शेवटचा शांतता मार्च असणार असल्याचं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं. यावेळी सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा देखील दिला.
Sujat Ambedkar News
Sujat Ambedkar Saam tv
Published On

परभणी : परभणीत कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी आज शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात शांतता मार्च काढण्यात आला. या शांतता मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी प्रशासनावर आणि पोलिसांवर थेट आरोप केले. शांततेचा आजचा हा शेवटचा मार्च आहे, असा स्पष्ट इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

सुजात आंबेडकर म्हणाले, घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरातील पुतळा विटंबनेप्रमाणेच परभणीमध्ये जे काही घडले, ते आधीच ठरवलेले होतं. लोक रस्त्यावर येणार हे माहीत होते. तरीही पोलिसांनी शांतता राखण्याऐवजी वस्त्यांमध्ये घुसून निर्दोष नागरिकांना बेदम मारहाण केली'. तसेच सुजात आंबेडकर यांनी यावेळी पोलीस आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले'.

Sujat Ambedkar News
Indian Student : भारताला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांंचं स्वप्न भंगलं, ५ राज्यातील मुलांना प्रवेशबंदी, कारण?

'पोलिसच नव्हे, तर बाहेरून आणलेले गुंड मंत्र्यांचे किंवा गावगुंडांचे होते त्यांनीही कार्यकर्त्यांवर हल्ले केले. हे सगळं व्हिडिओंमधून स्पष्ट दिसत आहे. बाबासाहेबांची सही, अशोकचक्र, जय भीम आणि संविधान लिहिलेल्या गाड्याही पोलिसांनी तोडल्या. पोलिसांच्या कृत्यामुळे समाजात संतापाची लाट उसळली. प्रियदर्शीनगरमध्ये एका गर्भवती महिलेला रस्त्यावर लोळवत पोलिसांनी मारहाण केली आणि महिला पोलिसही तिथे उपस्थित नव्हत्या, असे सुजात आंबेडकर पुढे म्हणाले.

Sujat Ambedkar News
Kalyan : कैरी तोडण्यावरून वाद विकोपाला, मुलाच्या वडिलांवर धारदार शस्त्राने हल्ला, कल्याणमध्ये खळबळ

मार्चदरम्यान सुजात आंबेडकर यांनी काही नेत्यांवरही निशाणा साधलाय. सूर्यवंशींना न्याय मिळावा, यासाठी काढलेला परभणी ते मुंबई लाँग मार्च दलालांच्या अर्धवट नेतृत्वामुळे अपयशी ठरलाय. कोणाच्या मृत्यूवर नेतेगिरी करत असेल, तर समाज त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला. राज्यातील संविधान प्रेमी समाजात पोलीस अत्याचारांविरोधात तीव्र संताप आहे. न्याय मिळेपर्यंत वंचित बहुजन आघाडी हा लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा सुजात आंबेडकर यांनी दिला.

Sujat Ambedkar News
Fact Check : २००० रुपयांहून अधिकच्या UPI पेमेंटवर जीएसटी लागणार? काय आहे सत्य? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com