Indian Student : भारताला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांंचं स्वप्न भंगलं, ५ राज्यातील मुलांना प्रवेशबंदी, कारण?

Indian Student News : भारताला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाला शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आहे. देशातील ५ राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
istudent
Indian Student Saam tv
Published On

ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणाचं स्वप्न घेऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियातील अनेक विद्यापीठात भारतातील पाच राज्यातील विद्यार्थ्यांचा व्हिसा थांबवण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब,हरियाणा आणि गुजरात या राज्याचा समावेश आहे. व्हिसाचा दुरुपयोग आणि बनावट कागदपत्रांच्या घोटाळ्यानंतर ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांनी मोठं पाऊल उचललं आहे.

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचा आरोप आहे की, 'पाच राज्यातील विद्यार्थी शिक्षणाचा व्हिसा घेऊन ऑस्ट्रेलियात येतात. त्यानंतर येथे पूर्णवेळ नोकरी करतात. ते अभ्यासाकडेही दुर्लक्ष करतात. अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली नोकरी करण्यास आल्याचे उघड झाले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातील विद्यापीठावर नकारत्मक परिणाम होत असल्याचे तेथील विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणं आहे'.

istudent
Pune Weather Update : पुणे तापले! ऊन्हाच्या असह्य झळा, उकाड्याने लोकांचे हाल; पुढील ५ दिवस कसं राहणार तापमान?

ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया विद्यापीठ, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, एडिथ कोवान विद्यापीठ, वोलोगोंग विद्यापीठ, टॉरेन्स विद्यापीठ या विद्यापीठांनी भारतातील पाच राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी घातली आहे. तसेच काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी अनेक निकष लावले आहेत. याआधी फेब्रवारी २०२३ मध्ये एडिथ कोवान विद्यापीठाने पंजाब आणि हरियाणातील विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नाकारला होता.

istudent
MNS Protest : हिंदी सक्तीचा वाद चिघळणार! मनसेककडून हिंदी माध्यमांची पुस्तके जाळण्याचा प्रयत्न

विद्यापीठाचं म्हणणं आहे की, फक्त विद्यापीठात प्रामाणिकपणे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांना व्हिसा नाकरण्यात येणार आहे. दलालांमार्फत बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती देऊन शिक्षणाच्या नावाखाली नोकरीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठाची विश्वासार्हता गमावण्याची शक्यता आहे, त्यामुळे विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

istudent
Bengaluru Couple Viral Video : लाजा सोडल्या! मेट्रो स्टेशनवरच तरुणाचे गर्लफ्रेंडशी अश्लील चाळे, व्हिडिओ पाहून तुम्हालाही चीड येईल

ऑस्ट्रेलिया सरकारने स्पष्ट केलं आहे की, 'विद्यार्थ्यांना प्रवेशबंदी सरकारने लावलेली नाही. हा निर्णय विद्यापीठाच्या पातळीवर घेण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त बैरी ओ फैरेल यांनी विद्यार्थ्यांना आधीच इशारा दिला होता की, बनावट कागदपत्रांचा आधार घेऊ नका. दलालांच्या बोलण्याला बळी पडू नका'. सरकारचं म्हणणं आहे की, 'विद्यापीठ प्रशासनाला जोखीम व्यवस्थापन आणि अंतर्गत योजनेअंतर्गत त्यांना अधिकार प्राप्त आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com