Find records of Kunbi-Maratha Caste in Marathwada CM Eknath Shinde orders to officials  Saam TV
मुंबई/पुणे

Kunbi Certificate: कुणबी-मराठ्यांच्या नोंदी शोधा, मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश; हैदराबादमधून काय माहिती मागवणार?

Kunbi Cast Certificate: मराठवाड्यातील कुणबी-मराठा समाजाच्या नोंदी शोधा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.

Satish Daud

Kunbi Cast Certificate: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहे. मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी मराठा संघटनांकडून केली जात आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले असून त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. मराठवाड्यातील कुणबी-मराठा समाजाच्या नोंदी शोधा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया करण्यासाठी नेमलेल्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या समितीने महिनाभरात याबाबतचा अंतिम अहवाल द्यावा, तसेच तातडीने हे काम पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

त्यानुसार, आता या नोंदी शोधण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं एक पथक तेलंगणातील हैदराबादला जाणार आहे. याशिवाय या पथकाकडून मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील अभिलेखांची तपासणी केली जाणार आहे. मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे.

दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी येथील आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली होती. पोलिसांकडून मारहाण झाल्यानंतर संतप्त मराठा आंदोलकांनी सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली. यादरम्यान, काही गाड्यांची तोडफोड तसेच जाळपोळ सुद्धा करण्यात आली.

यानंतर सरकारकडून अनेक मंत्र्यांनी उपोषणस्थळी थेट देऊन मनोज जरांगे यांची विचारपूस केली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेपूर्वी मराठवाडा विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. यावेळी कुणबी मराठा जातीच्या नोंदी शोधण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

यामुळे शासन मराठवाड्यातील कुणबी मराठा नोंद असलेल्यांना आरक्षणाचा लाभ देण्याच्या तयारीला लागले आहे. कुणबी मराठा नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद येथे अधिकाऱ्यांचे पथक जाणार आहे. प्रथम टप्प्यात कुणबी मराठा असलेल्या काही नोंदी आढळल्या आहेत.

आता दुसऱ्या टप्प्यात १९५० नंतरचे अभिलेख महसूल खात्याकडून तपासण्यात येणार आहेत. यात खासरा पाहणी पत्रक, सातबारा, जन्म दाखले, निजामकालिन शाळांचे प्रवेश निर्गम उतारे यासह जुन्या नोंदी असलेले अभिलेख तपासण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palash Muchhal : स्मृतीचा होणारा नवरा मुंबईत रुग्णालयात दाखल, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

SCROLL FOR NEXT