Political News : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी केंद्र सरकारचा नवा डाव, विशेष अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार?

Special Parliamentary Session : संसदेचं 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSaam tv

News Delhi News :

देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने भाजपसह एनडीएची डोकेदुखी वाढवली आहे. विरोधकांच्या एकीचा लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो याची जाणीव असल्याने भाजपने देखील रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. आता इंडिया आघाडीला धक्का देण्यासाठी केंद्र सरकारने नवा डाव आखल्याची चर्चा आहे.

संसदेचं 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार असल्याची चर्चा आता सुरु आहे. या अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय घटनेमधून इंडिया शब्द कायमचा हटवण्यासाठी केंद्र सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती आहे.  (Latest Marathi News)

PM Narendra Modi
National Parties Wealth: कोरोना काळात राष्ट्रीय पक्षांना अच्छे दिन, भाजपच्या संपत्तीत वेगाने वाढ; काँग्रेसची मालमत्ता किती?

भारतीय राज्यघटनेतून 'इंडिया' हा शब्द हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वतीने निवेदन दिल्यानंतर राज्यघटनेतून भारत हा शब्द काढून टाकण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे. (Political News)

सोमवारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हरनाथ सिंह यादव यांनीही भारतीय राज्यघटनेतून इंडिया शब्द हटवण्याची मागणी केली. हा शब्द वसाहती गुलामगिरीचे प्रतीक म्हणून काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात लवकरच पंतप्रधानांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. 'टीव्ही ९ भारतवर्ष'शी त्यांना संवाद साधला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com