Theft Of Crores In Torres Jewellery Caught On Camera Saam Tv
मुंबई/पुणे

Torres Jewellery: करोडोंची रोकड, हिरे घेऊन महिला मॅनेजर फरार; टोरेसमधील कोट्यवधीची चोरी कॅमेऱ्यात कैद

Theft Of Crores In Torres Jewellery Caught On Camera: टोरेसमधील कोट्यावधींची चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. करोडोंची रोकड हिरे घेऊन महिला मॅनेजर फरार झाल्या. ही चोरी कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

Priya More

स्नेहिल झणके, साम टीव्ही

तब्बल तीन लाख मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये मोठ्या बॅगांमध्ये टाकून पसार होणाऱ्या महिला दरोडेखोर कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. हे कोट्यवधी रूपये नेमके कुठून नेत होत्या आणि या दोन महिला मॅनेजर कुठे जात होत्या त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

टोरेसमधील कोट्यावधींची चोरी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. करोडोंची रोकड हिरे घेऊन महिला मॅनेजर फरार झाल्या. हा व्हिडीओ नीट पाहा. या व्हिडीओत दिसणाऱ्या बॅगा पुन्हा पुन्हा पहा. याच बॅगांमध्ये नागरिकांच्या घामाचे पैसे आणि हिरे भरण्यात आलेत आणि हेच पैसे लुटून पळून जाणाऱ्या या आहेत महिला डाकू. उझबेकिस्तानची रहिवासी तानिया कासातोव्हा आणि रशियाची स्टोअर इनचार्ज व्हेलेंटिना.

कोट्यावधींचे रोकड आणि हिरे बॅगेत भरतांना या दोघींना जेव्हा कर्मचाऱ्यांनी अडवलं त्यावेळेस त्यांनी थयथयाट केला... व्हिडीओ शुट करु नको, व्हिडीओ शूट करायला कोणी सांगितलं असा प्रश्न करत उलटा चोर कोतवाल को डाटे अशा अविर्भावात व्हिडीओ काढण्यावरच आक्षेप घेतला तर एकीचा पैसे लुबाडून तोंड लपवण्याचा प्रयत्न या व्हिडीओत कैद झालाय. मुंबईकरांचे पैसे लुबाडणाऱ्या या दोन महिला डाकूनां तुम्ही पुन्हा निरखून पहा.

हजारो नागरिकांनी जमवलेले कष्टाचे पैसे घेऊन दोन भामट्या महिलांनी देशाबाहेर पोबारा केल्याची शक्यताये. शहराच्या मध्यवर्ती भागात राजरोसपणे अलिशान ऑफीस थाटून फाडफाड इंग्लिश बोलून नागरीकांची सर्रास लूट होत होती आणि पोलिस तसंच इन्कम टॅक्स विभाग केवळ समन्स पाठवण्यात धन्यता मानत होते. त्यामुळे आता या डाकू महिलांसोबत या घोटाळ्याला फोफावण्यासाठी जे जे लोक आणि यंत्रणा सहभागी आहेत त्यासर्वांना या प्रकरणी सहआरोपी केल्यास भविष्यातील अशा घटना टाळता येऊ शकतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT