
मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे, जिथे देशभरातील विविध प्रांतातील आणि भाषेतील नागरिक आपापली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात. या शहरात प्रत्येक मेहनती व्यक्तीसाठी जागा आहे, आणि ती व्यक्ती सहजतेने इथे सामावून घेतली जाते. पण याच मुंबईमध्ये, ज्याची ओळख मराठी माणसाशी आहे, त्याची अवस्था चिंता जनक झाली आहे.
याचमुळे, कधी कधी किरकोळ कारणावरून त्याच्या कुटुंबावर हल्ले होतात, ज्यामुळे तो आपली ओळख, संस्कृती आणि मातृभाषेसाठी लहान होतो. मुंबई जेव्हा या मराठी माणसाला हिणवते आणि त्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं करते, तेव्हा ती शहराची असली ओळख नाही, ती केवळ त्याच्या स्वप्नांच्या धुंदीला अडथळा ठरते. पनवेलमध्ये सुद्धा अशी एक घटना घडली आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे.
पनवेल स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे परप्रांतीय लोकांनी एक मराठी कुटुंबावर मारहाण केली आणि त्यांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे कुटुंब पनवेल स्टेशनच्या परिसरात महिलांचे पर्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेले होते. परंतु, त्याचवेळी एका परप्रांतीय इसम आणि त्याच्या पत्नीने त्यांच्यावर हल्ला केला.
यावरून, मराठी कुटुंबियांनी परप्रांतीयांविरुद्ध गंभीर आरोप केला आहे. त्यांचा दावा आहे की, त्यांनी आपले व्यवसाय सुरू करण्याच्या कारणावरून त्यांना मारहाण केली आणि धमकावले. या प्रकरणात, खान्देश्वर पोलिसांकडून दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आणि गुन्हा दाखल करण्यास नकार दिला असल्याचा आरोपही मराठी कुटुंबाने केला आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी संबंधित प्राधिकरणाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.