Pune FDA Action: 16 Food Licences Suspended Over Safety Violations AI Image
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १६ आस्थापनांचे परवाने निलंबित

Pune FDA Raid News : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई केली. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छता आढळल्याने १६ आस्थापनांचे परवाने निलंबित.

Alisha Khedekar

  • पुण्यात ११ ते १४ ऑगस्टदरम्यान FDA ची धडक तपासणी मोहीम

  • गंभीर त्रुटी आढळलेल्या १६ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित

  • अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळले

  • शाळांच्या ५० मीटर परिसरात HFSS पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार

सचिन जाधव, पुणे

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत पुण्यात ११ ते १४ ऑगस्टदरम्यान ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी आढळलेल्या १६ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आली आहे.

तपासणीमध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता, अन्न हाताळणीतील त्रुटी तसेच अन्न सुरक्षा मानकांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. हॉटेल व रेस्टॉरंट विभागात फॉर्च्यून एंटरप्रायझेस (हॉटेल सयाजी), लोणावळा; हॉटेल चूल मटण, लोहेगाव; सिम्पली साऊथ, भोसरी; हॉटेल पवन, कोल्हापूर; राजेश चायनीज, सांगली; जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कॅन्टीन), वानवडी; बर्गर किंग, कॅम्प, पुणे; डॉमिनोज पिझ्झा, मलकापूर, कराड आणि पिझ्झा हट, कराड यांच्यावर कारवाई करण्यात आली.

यापैकी जेबीएम हॉस्पिटॅलिटी (कॅन्टीन) ही आस्थापना आवश्यक परवान्याविना सुरू असल्याचे आढळले. त्यामुळे संबंधित व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातही प्रशासनाने तपासणीची धडक मोहीम राबवली. झेप्टो लिमिटेड, लोहेगाव; स्विन्स्टा ईएनटी प्रायव्हेट लिमिटेड, वारजे; तसेच ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नर्‍हे आणि टिंबर मार्केट येथील आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, शाळांच्या परिसरातील खाद्यपदार्थांच्या विक्रीवरही प्रशासनाचे लक्ष आहे. शाळांच्या ५० मीटर परिसरात एचएफएसएस (हाय फॅट, शुगर अँड सॉल्ट) पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सकस अन्न उपलब्ध व्हावे, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात यापुढेही तपासणी व कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT